बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा रस्ते अपघातात मृत्यू

नवी दिल्ली | प्रसिद्ध तेलगु अभिनेत्री गायत्री ऊर्फ डॉली डी क्रुझचे रस्ते अपघातामध्ये वयाच्या 26 व्या वर्षी निधन झाले. गायत्रीच्या अपघाती मृत्यूने साऊथ इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. शुक्रवारी रात्री होळी साजरी करून गायत्री घराकडे जात होती. गायत्रीच्या अचानक मृत्यूने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

हैदराबादच्या गाचीबोवली भागात गाडीचा भीषण अपघात झाला. गायत्रीसोबत तिचा मित्र राठोड देखील होता. राठोडचाही या अपघातामध्ये दुर्देवी मृत्यू झाल्याची माहिती आहे.  भीषण अपघात झाल्याने गायत्रीचा जागीचं मृत्यू झाला आहे. गायत्रीचा मित्र जखमी अवस्थेत सापडला होता. राठोडला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान राठोडचाही मृत्यू झाला आहे.

गायत्री ऊर्फ डॉली डी क्रुझने लसा रायडू या युटयूब चॅनलवरून मोठी लोकप्रियता मिळवली होती. गायत्री सोशल मीडियावरही सक्रीय होती. गायत्रीच्या अचानक जाण्याने कुटूंबाला मोठा धक्का बसला आहे. अगदी कमी वयामध्ये निधन झाल्याने दु:खातून सावरणं कठीण झालं आहे. अभिनेत्रीचा मृत्यू तेलगू इंडस्ट्रीसाठी देखील मोठी हानी आहे.

दरम्यान, अभिनेत्री गायत्रीने अनेक शॉर्ट फिल्मध्ये काम केलं आहे. सोशल मीडियावर गायत्रीचा मोठा चाहता वर्ग आहे. मॅडम सर मॅडम अंते या वेबसिरिजमध्ये गायत्रीने काम केलं आहे. तिच्यासोबत काम करणाऱ्या सहकलाकारांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

Russia Ukraine War: …म्हणून रशिया-युक्रेन युद्धात हस्तक्षेप करण्यास नाटोने दिला नकार

Cyclone Alert: पुढील 12 तास महत्त्वाचे, ‘या’ भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता

Sharmila Thackeray: शर्मिला ठाकरेंची शिवसेनेवर घणाघाती टीका, म्हणाल्या…

सर्वसामान्यांना मोठा झटका, जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढ ?

“… तर भाजपवाले कधीपासून हिंदु झाले पाहावं लागेल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More