बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अभिनेत्री दिव्या भारती यांच्या वडिलांचे निधन; साजिद नाडियाडवालाने दिली अखेरपर्यंत साथ

मुंबई | प्रेक्षकांच्या मनावर 90च्या दशकात अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्रीपैकी दिवंगत बॉलिवूड अभिनेत्री दिव्या भारतीचं नाव घेतलं जातं. अगदी कमी कालावधीत तिने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. अशातच दिव्या भारतीचे वडिल ओम प्रकाश भारती यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.

प्रसिद्ध चित्रपट निर्माता साजिद नाडियाडवाला हे ओम प्रकाश भारती यांच्यासोबत शेवटच्या क्षणापर्यंत असल्याचं बोलण्यात येत आहे. साजिद नाडियाडवाला यांची दुसरी पत्नी वर्दा खान नाडियाडवाला हिने ओम प्रकाश भारती यांच्या निधनाची बातमी दिली आहे.

शनिवारी 30 ऑक्टोबर 2021 रोजी दिव्या भारतीचे वडिल ओम प्रकाश भारतीच्या निधनाची माहिती समोर आली होती. त्यांचे निधन नेमक्या कोणत्या कारणांमुळे झाला आहे. याबद्दल अद्यापही कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, साजिद नाडियाडवालाने दिव्या भारतीशी 1992 मध्ये लग्न केलं होतं. परंतु त्याच्या एक वर्षानंतर 5 एप्रिल 1993 रोजी दिव्या भारतीचा राहत्या घराच्या वरच्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. त्यानंतर साजिद दिव्याच्या आई-वडिलांची काळजी घेत होता.

पाहा पोस्ट –

थोडक्यात बातम्या-

‘राज्यकर्ते काय लायकीचे आहेत हे…’; राजू शेट्टींची जहरी टीका

फडणवीसांच्या इशाऱ्याला नवाब मलिकांचं तीन शब्दात प्रत्युत्तर, म्हणाले…

पराभवानंतर विराट कोहली म्हणतो, “स्पर्धा अजून संपलेली नाही, आता…”

‘तुमच्यात जर ऐवढी हिंमत असेल तर स्वत:च्या…’; राम कदम आक्रमक

‘मला ईडीचा समन्स आला तेव्हा…’; व्हिडीओ शेअर करत अनिल देशमुखांनी दिलं स्पष्टीकरण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More