बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज कुंद्रा प्रकरणातील अभिनेत्री गहना वशिष्ठचा नवा धक्कादायक दावा

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती आणि नामांकित उद्योजक राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर पॉर्न फिल्म बनवणे आणि त्या ऑनलाईन प्रदर्शित करणे हा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी अभिनेत्री गहना वशिष्ठ हिचं देखील नाव समोर आलं आहे. अशातच आता गहनाने एक व्हिडीओ शेअर करत काही धक्कादायक दावे केले आहेत.

मुंबईतील मालवणी येथे असणाऱ्या गहनाच्या फ्लॅटवर बेकायदेशीररित्या कब्जा करण्यात आला आहे. ज्या लोकांनी गहनाच्या फ्लॅटवर कब्जा केला आहे, त्यांच्यावर गहनाने काही गंभीर आरोप केले आहेत. ज्या लोकांनी माझ्या घरावर कब्जा केला आहे ते लोक माझ्यावर रेप करण्याची आणि मला मारण्याची धमकी देत आहेत, असा दावा गहनाने केला आहे. तसेच तिने या व्हिडीओमध्ये आणखीही काही गंभीर आरोप केले आहेत.

जानेवरीमध्ये काही अज्ञात लोकांनी माझ्या फ्लॅटवर कब्जा केला. मी ज्यावेळी फ्लॅटवर गेले तेव्हा हे लोक मला बोलले की, तुझ्यात दम असेल तर आम्हाला बाहेर काढून दाखव. जर पुन्हा येथे दिसली तर तुला जमिनीत गाडू. तुझं प्रेत देखील मिळणार नाही. मी तिथून पोलीस चौकीमध्ये गेले त्यांना सर्व सांगितलं. मात्र, पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली नाही, असा देखील दावा गहनाने या व्हि़डीओमध्ये केला आहे.

दरम्यान, गहनाने राज कुंद्राचं समर्थन करनारा एक व्हिडीओ देखील शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये ती म्हणाली होती की, कोणीही पॉर्न व्हिडीओ शूट केले नाहीत. एकता कपूरच्या ‘गंदी बात’ आणि कित्येक चित्रपटांप्रमाणे हे काही व्हिडीओ आहेत. ज्यामध्ये बोल्ड कंटेंट असतात. मला असं वाटतं की, आधी तुम्ही ते व्हिडीओ बघा आणि मग ठरवा व्हिडीओ अश्लील आहेत की नाही. 18 वर्षांवरील सर्व लोक समजूतदार आहेत. तसेच ते अश्लील आणि एरोटिकामधील फरक समजू शकतात. कोणताच व्हिडीओ अश्लील नसून सामान्य बोल्ड आहे. उगाच काही लोकांना टार्गेट केलं जातंय.

थोडक्यात बातम्या – 

पुणेकरांना एवघ्या एका रुपयात पेट्रोल, अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

राज्याला ड्रायव्हर नको, चांगला मुख्यमंत्री हवा- नारायण राणे

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ सुरुच, वाचा देशातील आकडेवारी

‘देशमुखांचं समर्थन करणाऱ्या ठाकरे सरकारचंही ‘तोंड’ काळं झालं’; भाजपची जहरी टीका

खडकवासला धरणातून विसर्ग सुरु, महानगरपालिकेचा नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More