बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मन उडु उडु झालं! मराठमोळ्या पद्धतीने पार पडला ह्रता आणि प्रतीकचा लग्न सोहळा, पाहा फोटो

मुंबई | फुलपाखरू मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री ह्रता दुर्गुळे (Hruta Durgule) व टीव्ही दिग्दर्शक प्रतीक शहाने (Prateek Shah) अखेर काल लग्नगाठ बांधली. कलाविश्वातील आघाडीची अभिनेत्री ह्रता गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी जीवनामुळे चांगलीच चर्चेत आली होती.

ह्रता व प्रतीकने बुधवारी मराठमोळ्या पद्धतीने लग्नगाठ बांधली. या शाही विवाहसोहळ्याचे खास फोटोस अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहेत. ह्रताने फोटो शेअर करताच चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनीही ह्रता व प्रतीकला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

ह्रता आणि प्रतीक दोघेही पारंपारिक वेशात एकमेकांना साजेसे दिसत आहेत. ह्रताने तिच्या लग्नात पिवळी व लाल काठांची कांचीपुरम साडी परिधान केली होती तर प्रतीकही ऑफ व्हाईट शेरवानीत शोभून दिसत होता.

दरम्यान, कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रपरिवाराच्या उपस्थितीत ह्रता व प्रतीकचा विवाहसोहळा पार पडला. गेल्या वर्षी 24 डिसेंबरला ह्रता व प्रतीकने साखरपुडा केला होता. त्यानंतर गुपचुप लग्न करत ह्रता व प्रतीकने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

पाहा फोटो-

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Hruta Durgule (@hruta12)

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Hruta Durgule (@hruta12)

थोडक्यात बातम्या-

विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळणार, राज्यासाठी पुढचे चार दिवस महत्त्वाचे

सर्वसामान्यांना मोठा झटका! घरगुती गॅस पुन्हा महागला

राज कुंद्राला मोठा झटका, पुन्हा एकदा अटक होण्याची शक्यता

दीपाली सय्यद यांनी पुन्हा राज ठाकरेंना डिवचलं, म्हणाल्या…

‘या’ लोकांनी का घेऊ नये कोरोनाचा दुसरा बूस्टर डोस?, WHO ने दिली महत्त्वाची माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More