बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मनी लाॅन्ड्रिंग प्रकरणात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचा मोठा खुलासा, म्हणाली…

मुंबई | अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernande) सध्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी (Money Laundering Case) ईडीच्या रडारवर आहे. तिहार तुरुंगातून 200 कोटींपेक्षा जास्त खंडणीचं प्रकरण समोर आलं होतं. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरु झाला. हा तपास आता बॉलिवूडपर्यंत येऊन ठेपला आणि यामध्ये जॅकलीन फर्नांडिसचं नाव समोर आलं.

मनी लॉन्ड्रिंग हे प्रकरण कॉनमॅन सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) या व्यक्तीशी संबंधित आहे. त्याच्यावर मनी लाॅन्ड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात जॅकलीनची फसवणूक झाली असल्याचं समोर आलं आहे.

मनी लाॅन्ड्रिंग प्रकरणात आता जॅकलीननं मोठा खुलासा केला आहे. सुकेश चंद्रशेखरन याने लाखो रुपयांच्या भेटवस्तू दिल्या असल्याचं तीनं मान्य केलं आहे. जॅकलिन हिच्या सौंदर्यावर सुकेश फिदा होता. त्यामुळे त्याने करोडो रुपयांची उधळण केली. लाखोंच्या महागड्या भेटवस्तू दिल्या. एवढंच नाही तर अमेरिकेत राहणाऱ्या जॅकलिनच्या बहिणीला एक लाख 50 हजार अमेरिकन डॉलर ट्रान्सफर केले आहेत. तसेच भावालाही पैसे दिले आहेत, असं जॅकलिन फर्नांडिसने ईडीला दिलेल्या निवेदनात हा खुलासा केला आहे.

दरम्यान, सुकेश डिसेंबर 2020पासून जॅकलीनला भेटण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र जॅकलीनने कधीच त्याच्या कॉलला उत्तर दिले नाही. फेब्रुवारी 2021मध्ये जॅकलीन सुकेशला भेटली तेव्हा त्याने स्वत:ची ओळख शेखर रत्न वेला अशी दिली. सुकेशने जॅकलीनला सन टीव्हीचा मालक असल्याचे सांगितलं असल्याचंही जॅकलीन म्हणाली.

थोडक्यात बातम्या – 

धक्कादायक! ‘या’ ठिकाणी Omicron मुळे पहिला बळी

राहुल गांधींची मुंबई सभा होणार?; उच्च न्यायालयात याचिका दाखल

“त्यांच्या बापाशी लढून मी पक्षाबाहेर पडलोय, नाना पटोले कुणाच्या…”

कपिल देवची इंग्रजी ऐकली का? 83चा व्हिडीओ तुफान व्हायरल; पाहा व्हिडीओ

Second Dose घेतलाय का? नसेल तर भरावा लागणार 500 रूपये दंड

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More