बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला ईडीचा जोरदार झटका; केली लूकआउट नोटीस जारी

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Actress Jacqueline Fernadez) चांगलीच चर्चेत असलेली पहायला मिळत आहे. आता पुन्हा एकदा जॅकलीनच्या अडचणींत वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे. मनी लॉन्ड्रिंग (Money Laundering) प्रकरणी ईडीच्या रडारवर आता अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आहे.

तिहार तुरुंगातून 200 कोटींपेक्षा जास्त खंडणीचं प्रकरण समोर आलं होतं. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरु झाला. हा तपास आता बॉलिवूडपर्यंत येऊन ठेपला आहे. याप्रकरणी आता सध्या अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला (Actress Jacqueline Fernadez) भारताबाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

जॅकलीनविरोधात आता लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली  आहे. यामुळेच रविवारी जॅकलीनला मुंबई विमानतळावर रोखण्यात आलं. यावेळी तिची चौकशी करण्यात आली तसंच दिल्लीमध्ये तपास यंत्रणेसमोर हजर राहावं लागणार असल्याचं सांगण्यात आलं.

दरम्यान, . मनी लॉन्ड्रिंग हे प्रकरण कॉनमॅन सुकेश चंद्रशेखर या व्यक्तीशी संबंधित आहे. त्याच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस अडचणींत सापडली असून आता तिच्यासोबत नोरा फतेहीचंही नाव समोर आलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘…नाहीतर मोठ्या प्रमाणात Omicron चा संसर्ग होऊ शकतो’; राजेश टोपेंचा गंभीर इशारा

शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवींचा मोठा निर्णय; स्वीकारणार हिंदू धर्म

फक्त ‘या’ पेयांचा आहारात समावेश करा आणि झटपट वजन कमी करा

“गिरीश कुबेर आपल्या पुस्तकातून शरद पवारांपेक्षा फडणवीस श्रेष्ठ असल्याचं मांडताना दिसतात”

‘तुम्ही भाजपत या आम्ही तुम्हाला पैसे अन् कॅबिनेट मंत्रिपद देऊ’; ‘या’ नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More