बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कोरोना रुग्णामागे मिळणारे दीड लाख बंद झाले म्हणून…’; ‘या’ मराठी अभिनेत्रीने केला संताप व्यक्त

मुंबई | कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. याला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत.  त्यात मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. त्यात मॉलमध्ये जायच असेल तर आधी कोरोना चाचणी करावी लागणार आणि अहवाल निगेटिव्ह आला तरच प्रवेश करता येईल असा नियम लागू करण्यात आला आहे. मात्र यावर अभिनेत्री जुई गडकरीने संताप व्यक्त केला आहे.

ठाण्याचे जांभळी मार्केट आणि बेस्टच्या तुडुंब भरलेल्या बसमधून जायला कोणता रिपोर्ट द्यायचा? असा प्रश्न जुईने उपस्थित केला आहे. फेसबुकवर तिने एका पोस्टद्वारे गर्दीचे काही फोटो शेअर करत आपला राग व्यक्त केला आहे. प्रत्येक रुग्णामागे मिळणारे दीड लाख बंद झाले म्हणून ही दुसरी लाट आली आहे?, असा गंभीर आरोप जुईने फेसबुक पोस्टमधून केला आहे.

‘कोव्हिड 19 निगेटिव्ह रिपोर्ट मॉलमध्ये प्रवेशासाठी बंधनकारक. आणि ठाण्याच्या जांभळीच्या मार्केटमध्ये जायला कोणता रिपोर्ट? बेस्टच्या तुडुंब भरुन जाणाऱ्या बसमधून जायला कोणता रिपोर्ट? परवाच कर्जतजवळच्या अंकल्स किचनबाहेर दोनशेपेक्षा जास्त गाड्या लागल्या होत्या आणि जोरदार लग्न सुरु होतं. मग 50 माणसांचा नियम कुठे गेला?’ असा परखड प्रश्न जुईने प्रशासनाला विचारला आहे.

दरम्यान, यासोबतच तिने ‘परवा माझ्या एका मैत्रिणीची डिलीव्हरी आधी कोव्हिड चाचणी केली आणि चाचणीचा अहवाल दुर्देवाने पॉझिटिव्ह आला. त्यानंतर तिचं सी सेक्शन दुसऱ्या रूग्णालयात करावं लागलं. कारण तिला ज्या रूग्णालयात डिलीव्हरीसाठी नेलं होतं त्यांनी तिला दाखल करण्यास नकार दिला. विनोदाची गोष्ट म्हणजे कोरोनाग्रस्त रुग्ण असूनही तिला बाळाला स्तनपान करु दिलं. बाळ तिच्यापासून अवघ्या पाच फुटांवर ठेवलं होतं. ती असिम्पटमॅटिक होती. मात्र त्यांना भरमसाठ बिल भरावं लागलं’,  अशी तक्रार जुईने फेसबुक पोस्टमधून केली. ‘नक्की काय चाललंय काहीच कळायला मार्ग नाही. कोरोना खरंच आहे की आता प्रत्येक रुग्णामागे दीड लाख मिळत होते, ते बंद झाले म्हणून ही दुसरी लाट आली आहे?’ असा गंभीर सवाल जुईने उपस्थित केला आहे.

 

 

Covid-19 -ve report compulsory for entering malls! Ani Thanyacha Jambhli cha market madhe jayla konta report?? Best cha…

Posted by Jui Gadkari on Friday, March 19, 2021

 

थोडक्यात बातम्या

कोरोना झालेल्या विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारेे असणार विशेष परीक्षेचं आयोजन, जाणून घ्या!

‘…तर ठाकरे सरकार मृतवत म्हणावे का? लवकरच तेरावं घालावे लागेल’- अतुल भातखळकर

आई-वडिलांच्या लग्नात चिमुकलीचा हायव्होल्टेज ड्रामा ; व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

दहावी आणि बारावी परिक्षांबाबत शिक्षणमंत्र्यांनी केली मोठी घोषणा, म्हणाल्या…

…म्हणून महिलेने तुरूंगात असलेल्या पतीसोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी न्यायालयात मागितली परवानगी!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More