बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अभिनेत्री कंगणा राणावतला कोरोनाची लागण!

मुंबई | देशात कोरोनानं अक्षरशः हाहाकार माजवलाय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला मोठा फटका बसताना दिसत आहे. दररोज कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत चालली आहे. अनेकजण कोरोनाशी  दोन हात करत आहेत. यामध्ये दिग्गजांचाही समावेश आहे. अनेक दिग्दर्शक, अभिनेते कोरोनाशी झुंज देत आहे. आता अभिनेत्री कंगणा राणावत देखील कोरोनाच्या विळख्यात अडकली आहे. कंगणाला कोरोनाची लागण झाली आहे. तिने स्वतः याबाबत आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून माहिती दिली आहे.

कंगणा राणावतने इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. मागील काही दिवसांपासून मला खूप थकवा आला होता आणि माझे डोळे देखील जळजळत होते. हिमाचलला जाण्यापूर्वी मी काल माझी कोरोना टेस्ट करून घेतली होती आणि आज त्याचा निकाल आला आहे, असं कंगणाने सांगितलं.

मला काही कल्पनाच नाही आहे की हा व्हायरस माझ्या शरिरात पार्टी करतोय, आता मला एवढं माहिते की मी त्याला संपवेन, कोणत्याही शक्तिला तुमच्यापेक्षा वरचढ होऊन देऊ नका, तुम्ही जर घाबरलात तर ते आणखी तुम्हाला घाबरवेल, असंही कंगणा म्हणाली.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचं सरकार स्थापन झाल्यापासून कंगना टीएमसीविरोधात विविध प्रकारचे ट्विट करत होती. भाजपला पाठिंबा देत कंगना उघडपणे टीएमसीवर निशाणा साधत होते. गँगरेपचा आरोप करत कंगणाने टीएमसीविरोधात ट्वीट केले होते, त्यानंतर ट्विटरने तिचं खातं निलंबित करण्यात आलंय.

 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

 

थोडक्यात बातम्या- 

हृदय पिळवटून टाकणारी घटना; तीन भावांचा एकापाठोपाठ कोरोनामुळे मृत्यू

मंगळावर अज्ञात हेलिकॉप्टरचा वावर? नासाच्या रोव्हरने पात्यांचा आवाज केला कैद, पाहा व्हिडीओ

पुण्यात देशातलं पहिलं ‘चाईल्ड कोविड सेंटर’ उभारणार; पुणे महापालिका अलर्ट मोडवर

मराठमोळ्या ऑक्सिजन संशोधकाचा ऑक्सिजनअभावी मृत्यू; डॉ. भालचंद्र काकडे यांचं निधन

कोरोना रुग्णांना होतोय ‘म्युकर मायकोसिस’ हा गंभीर आजार; 20 जणांचे डोळे निकामी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More