बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लाखो जणांच्या दिलाची धडकन असणारी अभिनेत्री मौनी राॅय अखेर अडकली लग्नबंधनात

मुंबई | लाखो जणांच्या दिलाची धडकन आणि तरुण मुलांची आकर्षण असणारी अभिनेत्री मौनी राॅय नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. सध्या सोशल मीडियावरही तिच्या लग्नाची चर्चा पहायला मिळत आहे. याशिवाय लग्नाचे फोटोही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असलेले पहायला मिळत आहे.

अभिनेत्री मौनी राॅयनं तिचा बाॅयफ्रेंड सूरज नांबियार याच्याशी आज 27 जानेवारी रोजी लग्नगाठ बांधली आहे. या दोघांनी दाक्षिणात्य पद्धतीनं लग्न केलं आहे. त्या दोघांच्या लग्नातील फोटो शेअर करत मौनीनं ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.

लग्नात मौनीनं परिधान केलेल्या साडीत ती अतिशय सुंदर दिसत असून तिच्या कपड्यांवर सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत. अनेकांना तिनं केलेला साज खूप भावला आहे.

दरम्यान, मौनीने आपल्या लग्नात पांढऱ्या रंगाची आणि लाल काठ असणारी साडी नेसली आहे. मौनी रॉय पारंपरिक दागिन्यांनी नटली आहे. या मल्याळम लुकमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य अजून खुलून दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर मौनी आणि सूरजच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by mon (@imouniroy)

थोडक्यात बातम्या – 

IPL 2022 ! किंग कोहली पुन्हा कर्णधार होणार?; आरसीबीने स्पष्टच सांगितलं…

“मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे, तुमच्यात हिंमत असेल तर…”

अब्दुल सत्तारांनी पुन्हा छेडला ‘सेना-भाजप युती’चा राग, म्हणाले..

‘म्युझिकल थेरेपी’! व्यायाम करुन घेण्यासाठी नर्सनं लढवली अनोखी शक्कल, पाहा व्हिडीओ

पुष्पाची क्रेझ संपता संपेना! आता ब्रावोनं केला भर मैदानात ‘पुष्पा’वर हटके डान्स, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More