बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रामदास आठवलेंच्या उपस्थितीत अभिनेत्री पायल घोषचा ‘आरपीआय’मध्ये प्रवेश!

मुंबई | अभिनेत्री पायल घोषने आरपीआयचा झेंडा हाती घेत राजकारणात प्रवेश केला आहे. रामदास आठवलेंनी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत पायल घोषचा पक्ष प्रवेश पार पडला आहे.

रामदास आठवलेंनी नेहमीच माझी बाजू घेतली. त्यासाठी  मी सरांची आभारी आहे. त्यांनी मला नेहमीच मदत केली. त्यांनी महिलांना नेहमी पाठिंबा दिला आहे, म्हणूनच मी आरपीआय पक्षात सहभागी होण्याचे ठरवलं, असं पायल घोष म्हणाली आहे.

पायल घोषवर अन्याय झाला होता. तिने अनुराग कश्यपविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पायलवर अन्याय झाल्याने आपण तिची बाजू घेतली, आंदोलन केले, राज्यपालांना भेटलो. यानंतर याप्रकरणात पुढच्या हालचाली सुरू झाल्या. मात्र, पोलिसांनी अद्याप अनुरागला अटक केली नाही. त्याच्या विरोधात कोणतीही कारवाई केली नाही. यासगळ्यात आम्ही पायलसोबत आहोत, असं आठवलेंनी यावेळी सांगितलं.

पायलसाठी आम्हाला थेट पश्चिम बंगालहून फोन आले. म्हणूनच आम्ही पायलला पाठिंबा देत आहोत. अनुरागला अटक व्हावी ही आमची मागणी असून, आता पायल आरपीआय पक्षात प्रवेश करते आहे, असं आठवलेंनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

“मुख्यमंत्री सावरकरांबद्दल एकही शब्द का बोलले नाहीत? त्यांना नव्या मित्रांची भीती वाटत असावी”

मी तुमचं काय अभिनंदन करू मला अभिनंदन करायचीही लाज वाटत आहे- नितीन गडकरी

देवेंद्र फडणवीसांबाबत असं वक्तव्य करणं योग्य नाही- रोहित पवार

“शिवसेनेचं हिंदुत्व घंटा वाजवणारं हिंदुत्व नाही, मग मित्राच्या पाठीत खंजीर खुपसणारं आहे का?”

4 वर्षांचा चिमुरडा पोहोचला पोलीस स्टेशनमध्ये; तक्रार ऐकून पोलिसही हैराण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More