‘पक्षाच्या झेंड्याचा रंग कोणताही असला तरी…’, प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत
मुंबई। एकनाथ शिंदे यांच्या बंडावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महाविकास आघाडी सरकार पडणार की टिकणार, एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार, असे असंख्य प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर सर्वच स्तरांवरून प्रतिक्रिया उमटत आहेत.
अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) या राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे. प्राजक्ता माळीची ‘रानबाजार’ ही वेब सिरीज (Web Series) नुकतीच रिलीज झाली. ही सिरीज महाराष्ट्रातील राजकारणावर आधारित असून प्राजक्ताने या सिरीजमधील एक प्रसंग तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे.
सामान्य माणसांचा आता राजकारण्यांवर विश्वास राहिलेला नाही. खोटी आश्वासनं, अभद्र युत्या याची लोकांना सवय झाली आहे. पक्षनिष्ठा, पक्षाची तत्त्व या सगळ्या पुस्तकी गोष्टी झाल्या आहेत. पक्षाच्या झेंड्याचा रंग कोणताही असला तरी सत्तेचा रंग महत्त्वाचा, असा मकरंद अनासपुरेंच्या आवाजातील डायलॉग प्राजक्ताने शेअर केला आहे.
दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व उलथापालथ, सरकार संकटात, मोठा रानबाजार सुरू आहे, असंही प्राजक्ताच्या स्टोरीत आहे. राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं असून त्यात प्राजक्ताने केलेली ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
थोडक्यात बातम्या-
‘मला एकाच गोष्टीचं वाईट वाटलं…’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भावूक
‘सरकारचा फायदा घटक पक्षांना, शिवसैनिक मात्र फक्त भरडला गेला’; एकनाथ शिंदेंचं नवं ट्विट
“वाद सैन्य दलाच्या भरतीचा होता, मात्र चलाखीने शिवसेनेचा मुद्दा पुढे आणण्यात आला”
“समोर येऊन सांगा मी नालायक आहे राज्य कारभार करायला”
…आणि निरोपाच्या भाषणात उद्धव ठाकरे चक्क गोष्ट सांगायला लागले!
Comments are closed.