बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून अभिनेत्री प्राजक्ता माळीने मानले कोरोना व्हायरसचे आभार!

मुंबई| सध्या कोरोना विषाणूनं जगभरात थैमान घातलं आहे. जगभरात कोरोनामुळं बळी गेलेल्यांची संख्या साडेचार हजाराहून अधिक झाली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात मुंबईमध्ये कोरोनामुळं पहिला बळी गेला आहे.

अनेक चित्रपटांचे चित्रीकरण पुढं ढकलण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री प्राजक्ता माळीने कोरोना व्हायरसचे आभार मानणारी पोस्ट शेअर केली आहे. सध्या तिची पोस्ट तुफान व्हायरल होताना दिसतीय. आपल्या सर्वांनाच आरामाची गरज होती आणि ती कोरोनामुळे मिळाली असं ती या पोस्टमध्ये म्हणाली आहे.

प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर घरात आराम करतानाचा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो पोस्ट करत ‘दिवस असे की कोणी माझा नाही अन् मी कोणाचा नाही. धन्यवाद करोना. महाराष्ट्र दौरा आता ब्रेक के बाद. गरज होती आरमाची-आपल्या सर्वांनाच. कुटुंबाला वेळ देण्याची, स्वत:ला वेळ देण्याची, आत्मपरीक्षण करण्याची, Health on priority ठेवण्याची. म्हणून मिळालीये सुट्टी. ती सत्कारणी लावूया. सकस आणि ताजं खा (शक्यतो शाकाहार), व्यायाम करा, ध्यान करा… Proffesionals जे advise देताहेत ते पाळा. भिती नको, काळजी घेऊया’ असे तिने कॅप्शन दिले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील सर्व शाळांना महाविद्यालयांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं सुट्या दिल्यी आहेत. समाजमाध्यमातून कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जनजागृती केली जात आहे.

 

 

View this post on Instagram

 

दिवस असे की कोणी माझा नाही अन् मी कोणाचा नाही 🎯😛 . Thanks to #corona महाराष्ट्र दौरा आता Break ke Baad 😬 . गरज होती आरामाची-आपल्या सर्वांनाच🎯 . कुटुंबाला वेळ देण्याची, स्वत:ला वेळ देण्याची, आत्मपरीक्षण करण्याची, Health on priority ठेवण्याची. म्हणून मिळालीये सुट्टी. ती सत्कारणी लावूया. सकस आणि ताजं खा (शक्यतो शाकाहार), व्यायाम करा, ध्यान करा… Proffesionals जे advise देताहेत ते पाळा. भिती नको, काळजी घेऊया. And be assured everything will fall in place very soon❤️ . #loveandlight #stayfit #prajaktamali

A post shared by Prajakta Mali (@prajakta_official) on

ट्रेंडिंग बातम्या-

शिवसेनेनं काँग्रेस राष्ट्रवादीसोबतचं नातं तोडाव नाहीतर… – रामदास आठवले

कोरोनाचा महाराष्ट्रात पहिला तर देशात तिसरा बळी!

महत्वाच्या बातम्या-

प्रवाशांनी कोरोनामुळं केला ‘लाल परी’ला रामराम

महाराष्ट्राला किंचित दिलासा, 15 तासात एकही नवा रुग्ण नाही- राजेश टोपे

…अन् तेव्हापासून आईनं माझं नावं दगडू असं ठेवलं- सुशीलकुमार शिंदे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More