अभिनेत्री प्रिया बेर्डेंनी सोडली राष्ट्रवादीची साथ; केला ‘या’ पक्षात प्रवेश

नाशिक | राष्ट्रवादी काँग्रेसला (Ncp) मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्री प्रिया बेर्डे (Priya Berde) यांनी राष्ट्रवादी पक्षाला रामराम ठोकला आहे. प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.

अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये भाजपत प्रवेश केलाय.

2020 मध्ये प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादी सोडण्यामागचं कारण अद्याप स्पष्ट केलं नाही.

दरम्यान, कोरोनाच्या जागतिक महामारीत प्रियंका बेर्डे यांनी अनेक गरजवंतांना मदत केली होती. 2 वर्षातच प्रिया यांनी राष्ट्रवादीला रामराम केला असून नाशिकमध्ये भाजपत प्रवेश केला आहे. हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, प्रिया बेर्डे यांनी अनेक चित्रपाटत काम केलं असून त्या राजकारणात देखील सक्रिय आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More