Mahesh Bhatt | 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री अनु अग्रवाल ‘आशिकी’ चित्रपटामुळे एका रात्रीत स्टार बनली. मात्र तिचं स्टारडम जास्त काळ टिकलं नाही. महेश भट्टने बनवलेल्या ‘आशिकी’ चित्रपटाने अनुचं आयुष्य बदललं. अनु अग्रवालने एका मुलाखतीत याबाबत खुलासा केलाय.
महेश भट्ट (Mahesh Bhatt) आणि अनु अग्रवालचं अफेअर होतं अशा चर्चा त्यावेळी पसरल्या. याविषयी अनु अग्रवालने एका मुलाखतीत सांगितलं. अनु अग्रवालने बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत महेश भट्टसोबतच्या अफेअरवर मौन सोडलं.
अनु अग्रवालचा मोठा खुलासा
अनु अग्रवालच्या महेश भट्टसोबतच्या (Mahesh Bhatt) अफेअरची चर्चा पहिल्यांदा तेव्हा उठली जेव्हा आशिकीच्या शूटिंगदरम्यान, महेश भट्ट यांनी अनुला वनटेक कलाकार म्हणून संबोधण्यास सुरुवात केली. सेटवर ते अनेकदा अभिनेत्रीची स्तुती करत असे, त्यामुळे त्या दिवसांत त्यांच्या अफेअरच्या अफवा उडू लागल्या. याबाबत खुद्द अनु अग्रवालने खुलासा केलाय.
‘मी तरुण होते आणि एकटी रहायचे…’
या चुकीच्या अफवा आहेत. माझं आणि महेश भट्टचं काहीच अफेअर नव्हतं. मला ते डायरेक्ट म्हणून आवडायचे आणि त्यांना माझं काम आवडायचं, असं अनुने सांगितलं आहे. मी तरुण होते आणि मुंबईत एकटीच रहायचे. माझे आईवडिल नव्हते आणि मी मॉडेल म्हणून काम करायचे. ‘आशिकी’ मध्ये माझे सगळे शॉट वन टेक होते त्यामुळे महेश भट्ट (Mahesh Bhatt) मला वन टेक आर्टिस्ट म्हणायचे, असंही तिने सांगितलं.
त्यावेळी माझ्याकडे खूप काम होतं, त्यामुळे मी या अफवांकडे दुर्लक्ष केलं. मी एकटी राहणारी तरुण मुलगी होते, वयाच्या 22 व्या वर्षी एकटी सर्व काही सांभाळत होते, असंही तिने सांगितलं.
‘आशिकी’ चित्रपटामुळे स्टार झाेलेल्या अनु अग्रवालचं पूर्ण आयुष्य एक अपघातामुळे खराब झालं. एका पार्टीनंतर अनु तिच्या घरी परतत असताना तिच्या कारचा अपघात झाला. या अपघातामुळे अनुला अनेक फ्रॅक्चर होऊन ती कोमात गेली. अनु अग्रवाल 29 दिवस कोमात होती. कोमानंतर शुद्धीवर आल्यावर तिला जुन्या गोष्टी आठवल्या नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या-
अजित पवार लाडक्या बहीण योजनेसंदर्भात लवकरच ‘हा’ मोठा निर्णय घेणार
मराठा, कुणबी दरोडेखोर आहेत का? आंबेडकरांनी ‘या’ नेत्याला दिल चोख प्रत्युत्तर
LIC ने सादर केल्या दोन भन्नाट योजना; या लोकांना मिळणार खास सुविधा
सावधान! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट
धाराशिवच्या हॉटेलमध्ये राडा; राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक शिरले