मनोरंजन

वाढदिवसानिमित्त अभिनेत्री सहनूरने 30 हजार सॅनिटरी पॅडचं केलं वाटप

नवी दिल्ली | सध्या कोरोनाने जगभरात हाहाकार माजवला आहे. त्यातच मोठ मोठे व्यक्ती आणि कलाकार गरजूंना मदत करत आहे. काही संस्था मदतीचा हात पुढे करून जमेल तशी मदत करत आहे. काही महिन्यांपूर्वी अनेक कलाकारांनी पंतप्रधान मदतनिधीमध्ये मदत दिली आहे.

अभिनेत्री सहनूरने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी 30 हजार सॅनिटरी पॅडचं वाटप केलंय. मी सॅनिटरी पॅड आणि तोंडाचे मास्क घेऊन प्रत्येक घरात गेले होते. त्यातच मी काही महिलांना रस्त्यावर पाहिले, तो क्षण माझ्या मनाला लागून गेला. त्यांना अनेक गोष्टींची गरज असते, मग मी सॅनिटरी पॅड देण्याचे ठरवले. कारण प्रत्येक घरात महिला असते आणि प्रत्येक महिलेला याची गरज पडते.”

मला असं वाटतंय की आतापर्यंतचा हा सर्वात चांगला वाढदिवस साजरा केला आहे. समाजातील लोकांसाठी काहीतरी केलं, वास्तविकता त्यांना गरज होती. सध्या चालू असलेल्या टाळेबंदीत वाढदिवसानिमित्त मला यापेक्षा चांगली भेटवस्तू नाही मिळू शकत कारण मी गरजूंना मदत केली आहे

नुकतेच सहनूरच्या ‘गर्ल फ्रेंड’ गाण्याला संगीत रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, तसेच व्हिडिओमध्ये ती स्वतः अभिनय करत आहे. भविष्यात तिच्याकडे करण्यासाठी काही चांगले प्रोजेक्ट आहेत, याबाबत ती लवकरच खुलासा करेल, असं तिने सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती पुन्हा ईडी कार्यालयात दाखल

संजय राऊत…कधी येता कर्नाटकला?, मी मोकळाच आहे- नारायण राणे

“मुख्यमंत्र्यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान, हे संजय राऊतांचं म्हणणं हास्यास्पदच”

देशाच्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी डॉ. मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारला दिले ‘हे’ तीन सल्ले, म्हणाले…

भगवान परशुरामांची सर्वात मोठी मूर्ती बसवणार; मायावतींचं ब्राम्हण समाजाला आश्वासन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या