बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

साउथची ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली आई; तब्बल एक वर्षानंतर केला खुलासा

नवी दिल्ली | बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाने नुकताच एका गोंडस मुलाला जन्म दिला. आता अजून एक अभिनेत्री आई बनली असल्याची बातमी समोर येतेय. मात्र ही अभिनेत्री आता आई बनली नाही तर तिने एक वर्षापूर्वीच बाळाला जन्म दिला होता. ती अभिनेत्री म्हणजे श्रिया सरन. श्रिया सरनने इस्टाग्रामवरून ही बातमी शेअर केली आहे. श्रियाने  केलेल्या या खुलास्यामुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

श्रिया साउथची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. शिवाय तीने दृश्यम चित्रपटातून बॉलिवूडमध्येही पाय रोवला आहे. श्रियाने सकाळीच आपल्या पती व एक वर्षाच्या मुलीसोबतचा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. मात्र श्रियाने एक वर्षापासून ही बातमी सर्वांपासून लपवून का ठेवली? असाही प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. याबद्दल कोणालाच काहीही कल्पना नसल्याने सर्वजण चकित झाले आहेत.

श्रियाने केलेल्या पोस्टमध्ये तिने म्हटलंय,” नमस्कार, आमच्यासाठी 2020चं क्वारंटाइन सर्वात सुंदर ठरलं आहे. ज्या काळात संपूर्ण देश कोरोना महामारीला तोंड देत होता. त्या काळात आमचं आयुष्यचं बदलून गेलं आणि जबाबदारी, उत्सुकता, थ्रिल या सर्वच गोष्टी एकत्रचं आल्या. याच काळात मी एका सुंदर परीला जन्म दिला. देवाचे यासाठी खुप आभार.” अशी पोस्ट श्रियाने शेअर केली आहे.

श्रिया सरनने 2018मध्ये रशियन टेनिस खेळाडू आंद्रेइ कोशेव सोबत लग्नगाठ बांधली होती. आंद्रेइ हा उद्योजकदेखील आहे. लग्नानंतर श्रिया पतिसोबत बार्सिलोनाला शिफ्ट झाली होती. मात्र लॉकडाऊन उघडल्यानंतर श्रिया मुंबईत परतली आहे. श्रियाचा आर आर आर हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ज्युनियर एनटीआर सोबतच रामचरणही दिसणार आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shriya Saran (@shriya_saran1109)

 

थोडक्यात बातम्या-

“सत्तेत असून 100 टक्के बंद होत नसेल, तर तुमची काय लायकी आहे हे लक्षात येतं”

विराटनंतर आता ‘हा’ भारतीय खेळाडूही सोडणार आयपीएलचं कर्णधारपद?

टाटानंतर आता राकेश झुनझुनवालांना मिळाले पंख, वाचा सविस्तर

अजब चोरीची गजब कहाणी! शेतकऱ्याचा 100 क्विंटल कांदाच चोरट्यांनी केला लंपास

दिलासादायक! देशातील नव्या कोरोना रूग्णसंख्येत गेल्या 24 तासात लक्षणीय घट

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More