मोठी बातमी! प्रसिद्ध अभिनेत्रीचा भीषण अपघात; रुग्णालयातील फोटो समोर

Shweta Rohira | सिनेसृष्टीतून (Film Industry) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता रोहिराचा (Shweta Rohira) भीषण अपघात (Terrible Accident) झाला असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. अभिनेत्रीचा पाय फ्रॅक्चर (Leg Fracture) झाला असून ओठांनाही (Lips) गंभीर दुखापत झाली आहे. या भीषण अपघाताचे फोटो (Photos) पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

पुलकित सम्राटची (Pulkit Samrat) एक्स पत्नी (Ex-Wife) अभिनेत्री श्वेता रोहिराचा हा भीषण अपघात झाला आहे. अभिनेत्रीचे रुग्णालयातील (Hospital) फोटो व्हायरल होत आहेत. ज्यामधून अभिनेत्री थोडक्यात बचावली असल्याचे दिसत आहे. श्वेताने तिच्या इंस्टाग्रामवर (Instagram) फोटो शेअर करत या अपघाताविषयी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.

‘माझी काही चूक नसताना…’ श्वेताने सांगितला अपघाताचा प्रसंग

श्वेताने लिहिले, “आयुष्य आश्चर्याने (Surprises) भरलेले असते. एका क्षणी आपण ‘कल हो ना हो’ (Kal Ho Naa Ho) मधील गाणे गुणगुणत असतो तर दुसऱ्याच क्षणाला आपल्या दिवसाची व्यवस्थित आखणी (Planning) करत असतो. माझी काही चूक नसताना मी स्वतःला एका गाडीला धडकताना आणि हवेत उडून खाली पडताना पाहिले.”

श्वेता पुढे (Shweta Rohira)  म्हणाली, “मोडलेले हाड (Broken Bones), जखमेचे निशाण (Scars) आणि अंथरुणावर घालवलेले शेवटचे काही तास, हे माझ्या यादीत (List) नव्हते. पण विश्वाला (Universe) वाटले की मला अजून धैर्याची (Courage) गरज आहे. कधी कधी आयुष्य आपल्याला तोडते कारण आपल्याला पुन्हा मजबूत (Strong) बनवायचे असते.”

श्वेताची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहते (Fans) तिच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना (Prayers) करत आहेत.

या अपघातातून श्वेता (Shweta Rohira) सुखरूप बचावली असली तरी, तिला गंभीर दुखापत झाली आहे. तिच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.

Title : Actress Shweta Rohira Terrible Accident