‘तुमचा वेळ घ्या’ म्हणत हाॅट अंदाजात अभिनेत्रीचे फोटो होतायत व्हायरल!

Actress Shweta Tiwari | अभिनेत्री श्वेता तिवारी हीची सोशल मीडियावर प्रचंड मोठी फॅन फॉलोइंग आहे. अभिनेत्रीने बराच काळ हा मालिकांमध्ये गाजवला आहे. श्वेता सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशात तिच्या काही फोटोंची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

श्वेता तिवारी हिने सोशल मीडियावर अत्यंत खास असे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांच्या प्रचंड प्रतिक्रिया उमटत आहेत. या फोटोंवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत (Actress Shweta Tiwari) आहेत. पांढऱ्या रंगाचे अत्यंत खास असे टॉप श्वेता तिवारी हिने घातल्याचं फोटोमध्ये दिसून येतंय.

श्वेता तिवारीचे फोटो तूफान व्हायरल

यामध्ये श्वेताचं सौंदर्य तर घायाळ करणारं आहे. वयाच्या 43 व्या वर्षीही श्वेता तिवारीची फिटनेस कमालीची आहे. जसं जसं वय वाढत जाते, तशा चेहऱ्यावर वयाच्या खुणा दिसू लागतात. श्वेता तिवारीच्या बाबतीत मात्र हे जरा उलटच दिसून येतंय. चाळीशी पार केल्यानंतरही श्वेता आपल्या सौंदर्याने आणि अदांनी तरुण अभिनेत्रींना देखील मागे टाकते.

टीव्ही विश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी (Actress Shweta Tiwari) ही तिच्या प्रोफेशनल लाईफसोबतच खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.नुकताच झालेल्या एका मुलाखतीत तिने आपल्या पर्सनल लाईफबद्दल मोठा खुलासा केलाय.

श्वेता तिवारीने केला मोठा खुलासा

“माझ्या पूर्ण कुटुंबात कोणीच लव्ह मॅरेज केलं नव्हतं. मी केलं होतं.आमच्या कुटुंबात जातीय समस्या होत्या, तरीही मी आंतरजातीय विवाह केला. लोकांनी मात्र लग्न होण्यापूर्वीच माझ्या आईला टोमणे मारायला सुरुवात केली होती आणि माझ्या लग्नाला जज करण्यास सुरुवात केली होती.”, असा खुलासा श्वेता तिवारीने केलाय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari)

दरम्यान, श्वेताने (Actress Shweta Tiwari) 9 वर्षांनंतर पहिला पती राजा चौधरीला घटस्फोट दिला होता. सध्या ती दोन मुलांचा ‘सिंगल मदर’ म्हणून सांभाळ करत आहे. तिच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री लवकरच ‘सिंघम अगेन’ सिनेमात दिसणार आहे. सिनेमात श्वेता हिच्यासोबत अजय देवगन, दीपिका पादुकोण, अर्जुन कपूर, करीना कपूर, अक्षय कुमार आणि रणवीर सिंग देखील दिसणार आहेत.

News Title – Actress Shweta Tiwari Photos Viral

महत्वाच्या बातम्या-

अंबानींच्या कार्यक्रमात खाण्याच्या पदार्थात आढळलं असं काही, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

“जरांगेंनी 288 जागांवर निवडणूक लढवावीच, त्यांना एकदाचं कळूनच जाईल”

आता मद्यधुंद होत गाडी चालवल्यास थेट लायसन्स होणार रद्द; ‘या’ शहरात घेण्यात आला मोठा निर्णय

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला खिंडार?; ‘त्या’ नेत्यांची पुन्हा शरद पवारांकडे वाटचाल?

“छगन भुजबळांना आवरा, ते महाराष्ट्र पेटवतायेत”; जरांगे पाटील यांचा गंभीर आरोप