बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सुश्मिता सेनने उपलब्ध करुन दिले ऑक्सिजन सिलेंडर्स; चाहत्यांनाही केलं मदतीचं आवाहन

मुंबई | ऑक्सिजन, बेड्स, कोरोना रुग्णांना लागणारी औषधे या सगळ्यांची कमतरता भासू लागल्याने समाजातले अनेक लोक या गोष्टी उपलब्ध करुन मदतीचा हात पुढे करत आहेत. यात काही सेलिब्रिटींचाही समावेश आहे.

दिल्लीमधल्या ऑक्सिजनच्या समस्येबद्दल अभिनेत्री सुश्मिता सेनला ट्विटरवरून कळालं. यानंतर सुश्मिता सेनने काही ऑक्सिजन सिलेंडर्स उपलब्ध करुन दिले आहेत. मात्र ते मुंबईहून दिल्लीला नेण्यासाठी सोय उपलब्ध करुन देण्याचं आवाहन तिने चाहत्यांना केलं आहे. सुश्मिताने यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.

हे खरंच काळीज पिळवटून टाकणारं आहे. ऑक्सिजनची समस्या सगळीकडे भासत आहे. मी काही ऑक्सिजन सिलेंडर्स उपलब्ध केले आहेत. मात्र ते त्यांना मुंबईहून दिल्लीत पोहचवण्याची काहीही व्यवस्था नाही. काही मार्ग असेल तर सांगा, असं सुश्मिता म्हणाली.

एका युजरने सुश्मिता ला विचारलं की ऑक्सिजनची समस्या तर देशभरात आहे. मग मुंबईमध्ये सिलेंडर्स पुरवण्याऐवजी तुम्ही दिल्लीला का पाठवत आहात? त्यावर मुंबईमध्ये अजूनही ऑक्सिजनचा साठा उपलब्ध आहे. म्हणूनच मला सिलेंडर्स मिळाले. दिल्लीला गरज आहे, विशेषतः लहान दवाखान्यांनी. त्यामुळे तुम्हाला शक्य असल्यास मदत करा, असं तिने म्हटलंय.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

“अच्छे दिन, स्वर्ग दूरच राहिला, पण नरक तो हाच काय?”

“…तर घराबाहेर न पडताही तुम्हाला कोरोनाची लागण होऊ शकते”

‘या चोराकडून शिका’; कोरोना लस आणि इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांना जयंत पाटलांचा सल्ला

“राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर आणि ऑक्सिजन ऑडीट करा”

“…तर राजकारणात नरेंद्र मोदींना उद्धव ठाकरेंचा आदर्श ठेवावा लागेल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More