बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘तुमच्या मुलीमुळे तुमचा आदर करत होते, पण तुम्ही…’; स्वरा ‘या’ चित्रपट निर्मात्यावर भडकली

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ती सतत सोशल मीडियाद्वारे सामाजिक विषयांवर बिनधास्तपणे तिचं मत मांडत असते. पण सध्या ट्विटरवर स्वरा आणि चित्रपट निर्माते अशोक पंडित यांच्यामध्ये वाद सुरु असल्याचं दिसत आहे.

काका, मी तुमच्या मुलीसोबत काम केले आहे म्हणून मी तुम्हाला काका म्हणत होते. मी तिला खूप आधीपासून ओळखते, आमच्यामध्ये चांगले मैत्रीचे नाते आहे. तुमच्या मुलीमुळे मी तुमचा आदर करत होते. पण मला असं वाटतय तुम्हाला या आदराची सवय नाही, असं ट्विट करत स्वरा भास्करने अशोक पंडित यांना सुनावलं आहे.

स्वराने केलेल्या ट्विटनंतर अशोक पंडित यांनी ही उत्तर दिलं आहे. काकू, जेव्हा एखादी व्यक्ती योग्य वेळेत लग्न करते तेव्हा तिची मुले योग्य वेळेतच मोठी होतात. हा प्रत्येकाच्या नशीबाचा भाग आहे. आता जर कोणाचे लग्न होत नसेल किंवा ती करत नसेल तर याचा अर्थ असा नाही की ती व्यक्ती वयाने लहान आहे. चांगले तर माझे कुटुंब आहे, असं ट्विट करत  अशोक पंडित यांनी स्वराला प्रत्युत्तर दिलंय.

सध्या अशोक पंडित आणि स्वरा भास्करमध्ये जोरदार ट्विटर वॉर सुरु आहे. हे वॉर स्वराने काही दिवासांपूर्वी स्थलांतरीत कामगारांना मदत करण्यासाठी केलेल्या ट्विटमुळे सुरु झालं होतं.

ट्रेंडिंग बातम्या-

‘सरकारी रुग्णालयाची अवस्था अंधार कोठडीपेक्षाही भयंकर’; गुजरात सरकारला उच्च न्यायालयाने सुनावलं

31 मेनंतर लॉकडाऊन संपणार का?; उद्धव ठाकरे म्हणाले…

महत्वाच्या बातम्या-

बिपिन रावत दर महिन्याला पगारातून 50 हजार रुपये पीएम केअर फंडला देणार

राज्यात आज 1196 रूग्ण ठणठणीत होऊन घरी, पाहा नव्याने किती रूग्णांची झालीये नोंद

मुंबई विमानतळावरून दररोज 25 विमाने करणार उड्डाण; ठाकरे सरकारचा निर्णय!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More