बॉलिवूडमधील अभिनेत्री तापसी पन्नू हिचा आज वाढदिवस. आज तिने ३३ व्या वर्षात पदार्पण केले. पंजाबी परिवारात तिचा जन्म झाला. गुरू तेग बहादूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी या महाविद्यालयातून तिने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर काही दिवस तिने सॉफ्टवेअर अभियंता म्हणून नोकरीही केली होती.
तापसीने व्ही वाहिनीमध्ये ‘गेट गॉर्जियस’ या वास्तवता मांडणाऱ्या कार्यक्रमासाठी तिने चाचणी दिली होती. त्यातून तिची निवड झाली आणि तिचा हा प्रवास बॉलिवूडपर्यंत येऊन पोहोचला. त्यानंतर ती पूर्ण वेळ मॉडेल बनली. काम करत असतांना तिला असं जाणवलं की, यात आपली ओळख निर्माण होत नाही. तेव्हा तिने आपला प्रवास अभिनय क्षेत्राकडे वळवला.
तिने अभिनय क्षेत्राची सुरवात दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून केली. तिने बऱ्याच तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिचा ‘चष्मे बद्दूर’ हा पहिला हिंदी चित्रपट आहे. त्यानंतर ती अक्षय कुमारबरोबर ‘बेबी’ या चित्रपटात दिसून आली.
तापसी अजूनही अशा चित्रपटाच्या प्रतिक्षेत होती, ज्यामुळे तिची बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण होईल. आणि तिची ही इच्छा २०१६ मध्ये आलेल्या ‘पिंक’ चित्रपटामुळे पूर्ण झाली. त्यानंतर तिने मुल्क, नाम शबाना आणि बदला सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आणि ते सुपरहिट झाले. आपल्या कर्तृत्वाच्या बळावर एका विशिष्ट उंचीवर असलेल्या तापसीला वाढदिवसाच्या मनःपुर्वक शुभेच्छा…
महत्त्वाच्या बातम्या-
या सरकारचं स्टेअरिंग कुणाच्या हाती?, उद्धव ठाकरेंचं भन्नाट उत्तर
“सरकार मुक्याचे, बहिऱ्यांचे आणि आंधळ्यांचे… मंत्री जणू झपाटलेल्या सिनेमातील कलाकार”
“सध्याचं सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका”