बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ कारणामुळे तेजस्विनी पंडितने मागितली चाहत्यांची माफी, म्हणाली…

मुंबई |  मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितचे चाहते तिच्यावर जरा नाराज दिसत आहेत. तेजस्विनीने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांची माफी मागितली आहे. तेजस्विनीचे सोशल मीडियावर हजारो फॉलोअर्स आहेत. त्यांच्यासाठी तेजस्विनी दर नवरात्रीत कलाकृतींच्या माध्यमातून सामाजिक संदेश देत असते. पण यंदा ती कोणतीही कलाकृती सादर करणार नसल्याने चाहते मात्र नाराज झाले आहेत.

गेल्या तीन वर्षांपासून तेजस्विनी नवरात्रीच्या अगदी 9 दिवसात वेगवेगळ्या संकल्पनातून नारीशक्तीचा अविष्कार घडवते. तेजस्विनी अनोख्या कलाकृतींच्या माध्यमातून दरवर्षी काही ना काही सामाजिक संदेश देते. तेजस्विनीचे चाहते यंदाही तिच्या कलाकृतींची आतुरतेने वाट पाहत होते. नवरात्रोत्सव सुरू होण्याच्या काही दिवस आधीपासूनच तिला मेसेज करत यासंबंधी विचारणा करत होते.

पण तेजस्विनी तिच्या नवनिर्मितीच्या कामात व्यस्त असल्याने तिने यंदा कोणतीही संकल्पना साकारली नाही. यासाठी तिने चाहत्यांची माफीही मागितली. दरवर्षीप्रमाणे यावर्षी कोणतीही संकल्पना राबवणं शक्य झालं नाही यासाठी तुमची माफी मागते पण तुम्ही दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी तुमचे मनापासून आभार मागते, असं तेजस्विनीने या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

पण हा पुर्णविराम नाही, अर्धविराम आहे. तेव्हा पुढच्या वर्षी अजून दमदार संकल्पनेसह तन, मन, धन अर्पुण तुमच्या समोर येईल, असा विश्वास तेजस्विनीने दाखवला आहे.

 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Tejaswwini (@tejaswini_pandit)

थोडक्यात बातम्या-

“पाहुणे घरात आहेत, ते गेले की मग…”; अजित पवारांचा आपल्या खास शैलीत टोला

आर्यन खान प्रकरणात नवा ट्विस्ट; साक्षीदार तर निघाला फरार आरोपी

एनसीबी कारवाईबाबत नवाब मलिक करणार मोठा गौप्यस्फोट, तर्कवितर्कांना उधाण

महामार्गासाठी जमीन दिल्यास मिळणाऱ्या मोबदल्यात कपात; शेतकऱ्यांमधून नाराजीचा सुर

“फोनवरून टिका करणं सोपं आहे, मात्र तिकडे एनसीबीचे लोक लढा देतायेत”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More