अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर!

मुंबई | छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तुनिषा शर्माच्या (Tunisha Sharma) मृत्यू प्रकरणाने खळबळ माजवून दिली आहे. अभिनेत्री ‘अलीबाबा:दास्तान-ए-काबुल’ मालिकेत मरियमची भूमिका साकारत होती.

तुनिषाने काही दिवसांपूर्वी मालिकेच्या सेटवरच गळफास घेत आत्महत्या केली होती. यानंतर अभिनेत्रींच्या आईने मालिकेचा मुख्य अभिनेता आणि तुनिषाचा बॉयफ्रेंड शिजान खानवर (Sheezan Khan) गंभीर आरोप करत पोलिसांत तक्रार केली होती. त्यांनतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं.

शिझान खानला तब्बल दोन महिन्यानंतर जामीन मंजूर झाला आहे. शनिवारी झालेल्या सुनावणीत शिझानला जामीन मंजूर करण्यात आला आहे. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

अनेकवेळा त्याचा जामीन नामंजूर करण्यात आला होता.मात्र शनिवारी झालेल्या सुनावणीत न्यायालायने अभिनेत्याला जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे तब्बल दोन महिन्यानंतर अभिनेता तुरुंगातून बाहेर येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-