देश मनोरंजन

6 महिन्यांपूर्वीच दिले होते संकेत; अभिनेत्रीच्या आत्महत्येनं सिनेविश्वात खळबळ

बंगळुरू | कन्नड चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री जयश्री रमैया मृतावस्थेत घरात आढळली आहे. तिचा मृतदेह पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला आहे.

जयश्री गेल्या काही दिवसांपासून नैराश्याशी झुंजत होती. बंगळुरुच्या संध्या किरण आश्रमात तिच्यावर उपचार सुरु होते.

जयश्रीने आज सकाळपासून आपल्या मित्रांच्या आणि कुटुंबियांचे मेसेज आणि फोनला कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर आश्रमातील काही सदस्य जयश्रीच्या खोलीत तिच्या तपासासाठी गेले तेव्हा तिचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला.

जयश्री गेल्या काही दिवसांपासून काम न मिळाल्याने नैराश्यात असल्याची माहिती समोर येत आहे. तिने एकदा फेसबुक लाईव्ह केलं होतं. यात मला इच्छा-मृत्यू पाहिजे, असं जयश्री म्हणाली होती.

थोडक्यात बातम्या-

मी गळा कापून घेणं पसंत करेन पण भाजपसमोर झुकणार नाही- ममता बॅनर्जी

“घरी बसून दुसऱ्याची मापं काढली तर लोक तुम्हाला कायमस्वरूपी घरी बसवतील”

“ए शंकरपाळ्या…” महाराष्ट्राला वेड लावणारं लहान मुलांचं भांडण व्हायरल

“तुमचा सात-बारा भांडवलदारांच्या नावावर करण्याचा मोदींचा डाव”

शरद पवारांचं ते वक्तव्य खरं की खोटं?; राज्यपालांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या