मुंबई | देशात कोरोनाने थैमान घातलं आहे. दिवसागणिक कोरोनाच्या रूग्णांचा आकडा वाढताना दिसतोय. अनेक नेते मंडळी तसंच अभिनेते यांनाही कोरोनाची बाधा झालेली पहायला मिळाली. यामध्ये आता अभिनेत्री सारा खानला देखील कोरोनाची लागण झाली आहे.
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री सारा खान हिला कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोना झाल्यावर साराने स्वतःला होम क्वारंटाईन करून घेतलं आहे. तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे तिच्यावर घरीच उपचार सुरु आहेत.
साराने याबाबत एक स्टेटमेंट प्रसिद्ध केलं आहे. या स्टेटमेंटमध्ये नमूद केल्यानुसार, तब्येत बरी वाटत नसल्याने साराने शुटींगमधून ब्रेक घेतला होता. साराला कोरोनाची कोणतीही लक्षण जाणवत नव्हती. सध्या ती योग्य ती काळजी घेत असून डॉक्टरांद्वारे ती घरीच उपचार करतेय. शिवाय साराने गेल्या काही दिवसांत तिच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोरोना टेस्ट करून घेण्यास सांगितलं आहे.
सारा पुढे म्हणते, “मी घरगुती उपचार घेत आहे कारण ते चांगले असतात. कोरोना कोणालाही होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली आहे.”
महत्वाच्या बातम्या-
सिरम इन्स्टिट्युटच्या ‘या’ ट्विटमुळे भारतीयांचं टेन्शन वाढलं!
राज्यात कोरोनाचा कहर; दिवसभरात 23 हजार 446 नव्या कोरोना बाधितांची नोंद
“सुशांतच्या मृत्यूचा राजकीय ट्रम्प कार्ड सारखा वापर केला जातोय”
‘माझं सौभाग्य आहे की तुम्ही आमच्या घरी आलात’; आठवलेंनी घेतली कंगणा राणावतची भेट
Comments are closed.