बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शरद पवार तो काळ गेला”; ॲड. गुणरत्न सदावर्तेंचा पवारांना इशारा

मुंबई | एसटी महामंडळाचं शासनात विलीगीकरण व्हावं, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्याचा संप सुरू आहे. काल अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत एसटी कर्मचाऱ्यांसाठी पगारवाढीची घोषणा केली आहे. अशातच आता एसटी कर्मचाऱ्याचा संप मिटणार का? याकडे आता सर्वांच लक्ष लागलं आहे, अशातच आता अॅड गुणरत्न सदावर्ते यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर कडाडून टीका केली आहे. (Gunaratna Sadavarte criticized Sharad Pawar)

मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो, हे निर्णय तुबलकी निर्णय होते. शरद पवारांनी तोडून पाहिलं, जातीच्या रंगावर बोलून पाहिले. शरद पवार यांनी कष्टकरांच्या विश्वासघात केला आहे, हे मी डंके की चोटपर सांगतो. दत्ता सामंत यांच्या हत्येनंतर आता कर्मचाऱ्यांना टोडण्याचं काम शरद पवार यांच्या टोळीने केलं आहे, असं सदावर्ते म्हणाले आहेत.

आझाद मैदानांवरील पोलिसांना मी सांगतोय. माझ्या आंदोलकांच्या केसालाही धक्का लागला तर मी तुमच्या सिविल सर्विसेसची गुण कोळून पिलेत असंही सदावर्ते म्हणाले आहेत. शरद पवार आणि अनिल परब यांनी पोलिसांचा गैरवापर करत आहे. शरद पवारचा तो काळ गेला, ज्यावेळी 114 गोवारी लोक मेले होते, त्यावेळी शरद पवारांनी विमानतळावरून पळ काढला होता, अशी जहरी टीका देखील सदावर्ते यांनी केली आहे. आज हे काही घडलं ते फक्त नाटक होतं.

दरम्यान, सदावर्ते यांनी आझाद मैदानात एक मराठा, लाख मराठा अशा घोषणा देखील दिल्या आहेत. मिस्टर अनिल परब तुम्ही फसवणूक केली आहे. त्याचसोबत त्यांनी यावेळी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्यावर देखील टीका केली आहे.

थोडक्यात बातम्या-

एकेकाळी होती राहुल गांधींसोबत लग्नाची अफवा, आता केला भाजपमध्ये प्रवेश

“सरकारचा निर्णय मान्य आहे का?, सदाभाऊ आणि पडळकरांची फसवणूक झाली”

‘रात्रीस खेळ चाले’तून शेवंताची एक्झिट, जाता जाता सांगितले सिनेसृष्टीतले काळे कारनामे

“ठाकरे सरकारला खानच्या मुलाची चिंता पण पाटलांच्या मुलांची नाही”

फरार परमबीर सिंग यांचा ठावठिकाणा लागला, स्वत: दिली माहिती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More