Top News महाराष्ट्र सोलापूर

“सरकार मुक्याचे, बहिऱ्यांचे आणि आंधळ्यांचे… मंत्री जणू झपाटलेल्या सिनेमातील कलाकार”

पंढरपूर | महाविकास आघाडी सरकार मुक्याचे, बहिऱ्यांचे आणि आंधळ्यांचे असून मंत्री हे झपाटलेल्या सिनेमातील कलाकार आहेत. आपल्याच भातावर डाळ ओढण्याचं काम सध्याचं महाराष्ट्र सरकार करतंय, अशी घणाघाती टीका रयत क्रांती संघटनेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर केली आहे.

विरोधी पक्षाच्या दूध आंदोलनाच्या धर्तीवर बोलताना सदाभाऊ म्हणाले की, राज्यात सुरू असलेल्या दूध भेसळ घोटाळ्यास महाविकासआघाडी सरकार पाठीशी घालतंय. दुधाचे खाजगी प्रकल्प हे सरकारच्या संबंधित असून दूध भेसळ रोखण्यासाठी राज्य सरकारची यंत्रणा अपुरी असल्याची टीकाही सदाभाऊ यांनी यावेळेस लगावला.

तसेच सांगोला चौकात महाराष्ट्राचे आराध्य दैवत पांडुरंग यांच्या प्रतिकात्मक मूर्तीस अभिषेक घालताना पांडुरंगाकडे अनोखं साकडंही घातलं. या राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या दुधाला 10 रुपये अनुदान द्यावं..अन दूध भुकटीला प्रति किलो 50 रुपये निर्यात अनुदान देण्याची सुबुद्धी दे बा…अशा सूरात त्यांनी पांडुरांगाला साकडं घालत सरकारला टोला लगावला आहे.

दरम्यान, दूध दर आंदोलनाची ठिणगी पंढरपूरमध्ये पडली असून काल रात्री पंढरपूर तालुक्यात रयत क्रांती संघटनेच्या वतीने रस्त्यावर टायर जाळून आंदोलनाची सुरवात करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

चिमुरड्यांवर काळाचा घाला! भरधाव वेगानं जाणारा पिकअप चिरडून गेला अन…

कोरोनानं ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांच्या छातीत झालीय बुरशी; कोरोनाचं धक्कादायक वास्तव!

देशात कोरोनाचा हाहाकार, कालच्या दिवसातली धक्कादायक आकडेवारी….

“माझ्याबद्दल फार वाईट गोष्टी बोलल्या जात आहेत” रिया चक्रवर्तीचा भावुक व्हिडीओ व्हायरल

“अमित शहांच्या डोक्यात दिवसरात्र फक्त सरकार पाडण्याचा विचार चालू असतो”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या