देश

“अमित शहा आणि योगी आदित्यनाथ जिथे जिथे प्रचारासाठी गेले, तिथे भाजपचा पराभव झाला”

हैद्राबाद | हैद्राराबाद महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळालंय. हैद्राराबाद निवडणुकीच्या निकालानंतर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी पत्रकार परिषद घेत निवडणुकीच्या निकालावर भाष्य केलंय.

अमित शहा आणि योगी आदित्यनाथ जिथे जिथे प्रचारासाठी गेले, तिथे भाजपचा पराभव झाला, अशी खोचक टीका असदुद्दीन ओवैसी यांनी अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर केली आहे.

योगी आदित्यनाथ जिथे गेले तिथे काय झाले हे सर्वांनाच माहीत आहे. सर्जिकल स्ट्राईकबद्दल ते बोलले होते आता भाजपावर लोकशाही स्टाइक झाला आहे. आकडेवारी सर्वांसमोर आहे, असं ओवैसी म्हणाले. तसेच या निवडणुकीत आम्ही कठोर परिश्रम केले आणि हैद्राराबादच्या लोकांनी दिलेला निर्णय आम्ही स्वीकारला आहे. महापालिका निवडणूक आहे, थोडं खाली-वर होणारच आहे, असंही ओवैसींनी म्हटलंय.

दरम्यान, आम्ही लोकशाही मार्गाने भाजपशी लढू. आम्हाला विश्वास आहे की, तेलंगणातील जनता राज्यात भाजपचा विस्तार रोखेल, असंही असदुद्दीन ओवैसी यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

तामिळनाडूतील जिंजी किल्ल्यास जतन आणि संवर्धनासाठी मुख्यमंत्र्यांकडून 50 लाख रुपये जाहीर!

राज्यात रक्ताची टंचाई, जनतेने स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करावं- उद्धव ठाकरे

अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल, अर्णव गोस्वामींसह 2 जणांविरोधात गंभीर आरोप

“यापुढे राज्यातील भाजप नेत्यांनी झेपेल तितकंच बोलावं”

शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी बच्चू कडू दुचाकीवरून दिल्लीकडे रवाना!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या