अदानींना धक्यावर धक्के; अखेर घेतला मोठा निर्णय

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | हिंडनबर्ग रिपोर्टमुळे (Hindenburg Report) अडचणीत सापडलेल्या अब्जाधीश गौतम अदानी (Gautam Adani) यांना गेल्याकाही दिवसांपासून धक्क्यावर धक्के बसत आहेत. अशात कंपनीला आणखी एक झटका बसला आहे.

हिंडनबर्ग रिपोर्टमुळे (Hindenburg Report) अदानी समुहाच्या (Adani Group) शेअर्सच्या (Share) किमती कोसळल्याचं पाहायला मिळालं. कंपनीला दररोज कोट्यवधींचं नुकसान सहन करावं लागत आहे. आतापर्यंत कंपनीच्या एकूण मार्केट कॅपमध्ये 117 अब्ज डॉलरचं नुकसान (Damage) झालं आहे.

होत असलेल्या नुकसानामुळे कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. अदानी समूहानं हिंडनबर्गविरुद्ध (Hindenburg Report) थेट कायदेशीर लढा देण्याची तयारी केल्यानं आपलं संपूर्ण लक्ष डॅमेज कंट्रोलकडे दिलं आहे. त्यामुळे कंपनीकडून कर्ज फेडण्यापासून रोख वाचवण्यावर भर दिला जात आहे.

दरम्यान, अदानी ग्रूपनं पुढील आर्थिक वर्षासाठी आपलं रेवेन्यू टार्गेट पूर्वलक्ष्यीत अंदाजाच्या तुलनेत 40 टक्क्यांनी कमी केलं असून थेट 15 ते 20 टक्क्यांवर आणलं आहे, अशी माहिती समोर आलीये.

दरम्यान, हिंडनबर्गच्या अहवालामुळे फटका बसल्यानंतर पुन्हा उभारी घेण्यासाठी अदानी ग्रूपनं आपल्या फायनान्शियल हेल्थला सुधारण्याची तयारी सुरू केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-