NDTV बाबत अदानींचा मोठा निर्णय!

नवी दिल्ली | NDTV वृत्तवाहिनी सध्या आदानींच्या हातात गेली आहे. NDTV चे ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी देखील राजीनामा दिला. यामुळे अदानी आणि NDTV चर्चेत होते. याचसंबधी आता अदानींनी एक निर्णय घेतला आहे.

अदानी समूहाने NDTV चे शेअर्स खरेदी केले होते. त्याच NDTV च्या शेअरसंबधी आता अदानी ग्रुपला जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. ओपन ऑफर अंतर्गत खरेदी केलेले शेअर्ससाठी(shares) प्रति शेअर 48.65 रुपये अतिरिक्त किंमत देण्याचा निर्णय अदानी ग्रुपने घेतला आहे.

खुल्या ऑफरमध्ये खरेदी केलेले शेअर 294 रुपये प्रति शेअर इतका होता. 30 डिसेंबर रोजी, अदानी समूहाने NDTV संस्थापक आणि प्रवर्तक प्रणय राॅय (Pranay Roy) आणि राधिका राॅय यांच्याकडून मिडिया फर्ममधील 27.26% भागभांडवल 342.65 रुपये प्रतिशेअरने विकत घेतले होते.

अदानी ग्रुपने काही दिवसांपूर्वी हे शेअर्स विकायला काढले होते. NDTV मधील 26% स्टॉक खरेदी करण्याची अदानी समूहाची खुली ऑफर 22 नोव्हेंबरपासून(November) सुरु होती. 5 डिसेंबर रोजी ती बंद करण्यात आली.

अदानी ग्रुपकडून देण्यात आलेल्या ऑफरमध्ये 8.32% म्हणजेच 5.33 दशलक्ष इक्विटी शेअर्स प्रत्येकी 294 रुपये दराने दिले गेले. यानंतर मीडिया फर्ममध्ये(media firm)अदानी समूहाची हिस्सेदारी 37.5% पर्यंत वाढली.

ऑगस्ट 2022 मध्ये अदानी समूहाने NDTV मधील 29.18% हिस्सा खरेदी केला होता. अदानी समूहाने व्हिसीपीएल (VCPL) नावाची कंपनी विकत घेतली. याच व्हिसीपीएलकडे NDTV ची प्रवर्तक कंपनी आरआरपीआर (RRPR) होल्डिंगचे वाॅरंट होते.

महत्त्वाच्या बातम्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More