बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशात कोरोनाचा कहर; अदर पुनावालांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडे केली ही विनंती

नवी दिल्ली | अमेरिकेसह युरोपमधील काही देशांनी कच्च्या मालाचा पुरवठा थांबवल्याने कोरोनावरील लसीचे उत्पादन करणाऱ्या भारतातील सिरम इन्स्टिट्युटसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.

सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याकडे एक विनंती केली आहे. अमेरिकेमधून निर्यात होणाऱ्या कच्च्या मलावर लादलेले निर्बंध हटवण्याची विनंती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना केली आहे.

अदर पुनावाला यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष महोदय, जर कोरोना विषाणूला हरवण्यासाठी खऱ्या अर्थाने एकजूट व्हायचं असेल तर अमेरिकेच्या बाहेरील लस उद्योगाकडून मी तुम्हाला विनंती करतो की, अमेरिकेतून निर्यात होणाऱ्या कच्च्या मालावर घालण्यात आलेले निर्बंध हटवा. जेणेकरून कोरोनाविरोधातील लसींचे उत्पादन वाढवता येईल. तुमच्या प्रशासनाकडे याबाबतची पूर्ण माहिती आहे, असं ट्विट पुनावाला यांनी केलं आहे.

कोरोना लसीच्या कच्च्या मालावर बंदी घालणं म्हणजे लसीवर निर्बंध लादण्यासारखे असल्याचं पूनावालांनी म्हटलं होतं. सिरम इन्स्टिट्युटमध्ये नोवाव्हॅक्स या कोरोनावरील लसीचंही उत्पादन होत आहे. मात्र कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे हे उत्पादन बंद पडलंय.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

‘खरंच… हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे’; जितेंद्र आव्हाडांची कविता तुफान व्हायरल

‘कोरोना आपला पिछा सोडणार नाही, त्यामुळे…’; पूजा बेदीचा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले

सरसंघचालक मोहन भागवत कोरोनामुक्त; एवढे दिवस राहावं लागणार विलगीकरणात

‘अनिल देशमुख यांनी सीबीआयला दिलेल्या जबाबात…’; नारायण राणेंचा मोठा गौप्यस्फोट

दोन ‘कॅप्टन कुल’ मध्ये रंगणार सामना; ‘या’ खेळाडूंच्या कामगिरीवर विशेष लक्ष

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More