बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लसीच्या डोसची ऑर्डर मिळत नसल्यानं अदर पुनावांलांनी घेतला म्हत्त्वाच्या निर्णय!

नवी दिल्ली | दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरिएंट सापडल्याने जगभर एकच खळबळ उडाली. वेगाने पसरत असलेल्या कोरोनाच्या omicron व्हेरिएंटचा भारतातही शिरकाव झाला त्यामुळे आता सगळ्याच पातळीवर सतर्कता बाळगली जात आहे. (New Varient Of Corona)

ओमिक्रॉन व्हेरिएंट वेगाने पसरत असला तरी तो कमी घातक असल्याचा अनेक तज्ज्ञांचा दावा आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंट, बुस्टर डोस याबद्दल अनेक संभ्रम असताना लसीच्या उत्पादनात घट करत असल्याचा मोठा निर्णय सीरम इन्स्टिट्युटचे प्रमुख अदर पूनावाला (Adar Poonawala) यांनी घेतला आहे.

महिन्याला उत्पादन करत असलेल्या डोसमध्ये 50 टक्के कपात करणार असल्याचं पूनावाला म्हणाले. केंद्र सरकारकडून लसीच्या डोसची योग्य ऑर्डर मिळत नसल्याने हा निर्णय घेतला असल्याची माहिती अदर पूनावाला यांनी एका मुलाखतीत बोलताना दिली.

दरम्यान, ओमिक्रॉन विषाणू किती गंभीर आहे हे आत्ताच सांगता येणार नाही. ओमिक्रॉनवर कोविशील्ड (Covishield) लस किती प्रभावी आहे हे येत्या दोन तीन आठवड्यात समजेल. ओमिक्रॉनकडे पाहाता बुस्टर डोस (Booster Dose) शक्य आहे, असंही अदर पूनावाला म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

3 मिनीटांत 900 कर्मचाऱ्यांना काढून टाकणाऱ्या भारतीय CEOनं अखेर माफी मागितली, म्हणाले…

CDS जनरल बिपीन रावत यांच्या निधनानंतर CDS पदासाठी ‘या’ मराठमोळ्या नावाची चर्चा

Omicronच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

‘…तर बिपीन रावत यांचा जीव वाचला असता’; त्या दिड मिनिटांनी घात केला

”जनरल बिपीन रावत यांची अपूर्व सेवा भारत कधीच विसरणार नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More