बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अशी करा Omicronवर मात; अदर पुनावाला यांनी शेअर केलं ‘ते’ सिक्रेट

मुंबई | दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने जगभरातील देशांची चिंता वाढवली आहे. भारतातही या Omicron व्हेरिएंटचा शिरकाव झाल्याने भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. ओमिक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी सध्या सगळ्याच स्तरांवर सतर्कता बाळगली जात आहे.

ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. त्यातच सीरम इन्स्टिट्यूटचे (Serum Institute) प्रमुख अदर पुनावाला (Adar Poonawala) यांनी ओमिक्रॉनवर मात करण्यासाठीची एक युक्ती सांगितली आहे. अदर पुनावाला यांनी एक भन्नाट मीम व्हिडीओ शेअर केला आहे. हॉलिवूड चित्रपट होम अलोनमधील एक सीन पुनावाला यांनी शेअर केला आहे.

घरात एकटाच असलेला छोटा मुलगा गुंडांशी दोन हात करतो, असा हा विनोदी सीन आहे. या सीनमधील गुंडांना डेल्टा (Delta) आणि ओमिक्रॉन (Omicron) अशी नावं दिली आहेत. कोरोनाला मात द्यायची असोल तर लसीची आणि बूस्टर डोसची गरज असल्याचं या व्हिडीओतून शेअर केलं आहे.

डेल्टा आणि ओमिक्रॉनला मात द्यायची असेल तर कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस (नोममगला) व ओमिक्रॉनला मात द्यायची असेल तर बूस्टर डोसची (Booster Dose) गरज असल्याचं अदर पुनावाला यांनी या व्हिडीओमधून सुचवलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

सचिनने ‘तो’ प्रश्न विचारला अन् माझी झोपच उडाली; रणवीर सिंगने सांगितला किस्सा

रावते म्हणाले, “मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो”; अजित पवारांनी मागे वळून पाहिलं अन्…

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पक्ष सोडण्याच्या तयारीत, एका ट्विटनं उडाली खळबळ

कोरोनाचा पुन्हा हाहाकार! ‘या’ देशात कडक लाॅकडाऊन लागू

प्रियांका-निकचा घटस्फोट?; अखेर प्रियांकाने सोडलं मौन, म्हणाली…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More