पुणे | सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. दोन ते तीन महिन्यांच्या अंतराने लस दिल्यास कोविशिल्ड ही लस 90 टक्के प्रभावी असल्याचं अदर पुनावालांनी सांगितलं आहे.
कोविशिल्ड लसीच्या प्रभाव क्षमतेबाबत दोन समूहांवर करण्यात आलेल्या चाचणीच्या निष्कर्षात एका महिन्याच्या अंतराने एका समूहाला ही लस देण्यात आली असता ही लस 60 ते 70 टक्के प्रभावी असल्याचं आढळलं. दुसऱ्या समूहाला दोन ते तीन महिन्यांच्या अंतरानं देण्यात आली असता लस 90 टक्के प्रभावी आढळली, अशी माहिती पुनावालांनी दिली आहे. तसेच लसीच्या पहिल्या डोसनंतर प्रतिकार क्षमता वाढणे सुरू होते. पहिला डोस घेतलेल्या पन्नास वर्षांखाली लोकांतही लसीचा उत्तम प्रतिसाद आढळून आला, असं पुनावालांनी म्हटलंय.
कोविशिल्ड लसीचं उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टीट्यूटला आपल्या लसींचं उत्पादन वाढवण्यासाठी 3 हजार कोटी रूपयांची गरज आहे, असंही अदर पुनावालांनी सांगितलं आहे.
कंपनीला आताच्या तुलनेत मोठा नफा कमवायला हवा होता. जेणेकरून ती रक्कम उत्पादन आणि सुविधांसाठी पुन्हा गुंतवता आली असती. तसंच अधिक डोसही उपलब्ध करता आले असते, असं अदर पूनावाला म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
नवरी मंडपात पोहोचली अन् सासूला समजलं ही तर आपलीच बेपत्ता झालेली मुलगी!
हो, मी लग्नाआधीच प्रेग्नंट होते पण…- दिया मिर्झा
‘या’ शहरात दिसलं काळजात धडकी भरवणारं चित्र; एकाच सरणावर 8 जणांचा अंत्यविधी
“…म्हणून मुंबई इंडियन्सने पुन्हा यावर्षीही आयपीएल जिंकावी”
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.