बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पठ्ठ्यानं पेट्रोल पंपावर भरलं डिझेल अन् केलं असं काही की…

मुंबई | पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीने सामान्य लोकांच्या तोंडचं पाणी पळवलं आहे. सततच्या होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे सामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे. तर सोशल मीडियावर देखील इंधन दरवाढ विषय चर्चेचा ठरला आहे. नेटकऱ्यांनी तर याला राष्ट्रीय प्रश्न बनवला आहे. तर पेट्रोल पंपावरचे अनेक लोक मजेशीर फोटो आणि व्हि़डिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

असाच एक भन्नाट फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. पेट्रोलच्या भावाने शंभरी गाठली तरी, डिझेलची किंमत लवकरच शंभरी गाठेल अशी चिन्हे आहेत. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये एक माणूस डिझेल भरताना पेट्रोल पंपावर लावलेल्या एका जाहीरातीच्या बॅनर समोर हात जोडताना दिसत आहे. त्या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असून त्यांच्या फोटोसमाेर हा माणूस हात जोडताना दिसत आहे.

पेट्रोलच्या किंमती शंभरी पोहचल्या आता कमीतकमी डिेझेलच्या किंमती तरी कमी राहु द्या असं हा माणूस म्हणत असावा. असे अनेक मजेशीर व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. तर काही दिवसांपूर्वी एक मुलगा डिझेलचा थेंब अन् थेंब गाडीत भरतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.

टेलीकाॅम सेक्टरमध्ये जिओच्या क्रांतीनंतर अनेक लोकांच्या अंगातले कलाकार बाहेर आले. काही टिकटाॅक स्टार झाले तर कित्येक लोक एका रात्रीत जगासमोर आले. प्रमुख माध्यमांना जरी हे विषय महत्वाचे वाटत नसले तरी विविध सामाजिक, राजकीय, आर्थिक विषयांवर सोशल मीडियावरून अशा प्रश्नांना वाव मिळताना दिसत आहे.

 

थोडक्यात बातम्या-

…तर तुम्ही दिल्लीच्या तख्तावर टेकू शकला असता का?- उद्धव ठाकरे

भारताच्या पराक्रमी लेकीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, ‘या’ पदावर नियुक्ती

मोठी बातमी! 10 आणि 12 च्या बोर्डाच्या परीक्षांचं नवं वेळापत्रक जाहीर

‘तुम्ही कोणाचीही तोंड चिपकवा मला….;’ चित्रा वाघ आक्रमक

“श्रीदेवीनंतर सातत्याने विनोदी भूमिका साकारणारी बॉलिवूडची मी दुसरी अभिनेत्री”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More