Top News कोरोना

कोरोना काळात सेवा देणाऱ्या इंटर्न डॉक्टरांना मिळणार अतिरिक्त भत्ता!

मुंबई | इंटर्नशीप करणाऱ्या डॉक्टरांसाठी एक चांगली बातमी आहे. कोरोना काळात सेवा देणाऱ्या इंटर्न डॉक्टरांना अतिरिक्त भत्ता देण्यात येणारे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात पाठपुरवठा केला होता. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉक्टरांना अतिरिक्त भत्ता देण्याचे आदेश दिलेत.

पुण्यातील इंटर्न डॉक्टरांना कोरोना भत्ता देण्यात आलाय. यामुळे राज्यातील इंटर्नशीप करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांनाही अतिरिक्त भत्ता मिळावा म्हणून राज्य सरकारकडे मागणी केली होती.

यासंदर्भात ‘थोडक्यात’शी बोलताना राज्यातील असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्नचे उपाध्याक्ष डॉ. प्रणय खेडकर म्हणाले, “कोरोनाच्या काळात सेवा दिल्याबद्दल अतिरिक्त भत्ता मिळावा यासंदर्भात आम्ही वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाकडे मागणी केली होती. या मागणीला आता प्रतिसाद मिळताना दिसतोय. अद्याप आमच्याकडे यासंदर्भात लेखी पत्र आलेलं नाहीये.”

थोडक्यात बातम्या-

ब्रिटनमधून दिल्लीत आले 7 हजार प्रवासी; प्रत्येकाचा घरी जाऊन सरकार करणार तपासणी

“मी मुख्यमंत्री असतो तर बच्चू कडूंचा राजीनामा घेतला असता”

मुंबई पोलिसांच्या अटकेच्या कारवाईनंतर सुरेश रैनाची प्रतिक्रिया, म्हणाला…

शेतकऱ्यांच्या परिस्थितीला पंडित जवाहरलाल नेहरू जबाबदार- मुकेश खन्ना

कोरोनाची लस घेतल्यावर ‘इतके’ दिवस मद्यपान करता येणार नाही!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या