देश

मनोज तिवारी यांना धक्का; भाजपच्या दिल्ली प्रदेशाध्यक्षपदावरुन उचलबांगडी

नवी दिल्ली | भाजपच्या दिल्ली प्रदेशाध्यक्ष पदावरुन मनोज तिवारी यांची उचलबांगडी करण्यात आली. दिल्ली प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आदेश गुप्ता यांच्याकडे सोपवण्यात आली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी गुप्तांची नियुक्ती केली.

मनोज तिवारी यांना पदावरुन हटवण्याचे नेमके कारण अस्पष्ट आहे. मात्र मनोज तिवारी यांच्या नेतृत्वात भाजपने दिल्ली विधानसभा निवडणुका लढवल्या होत्या. यामध्ये पक्षाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला.

भाजपला 70 पैकी केवळ आठ जागा जिंकता आल्या. दिल्ली काबीज करता न आल्याचे पडसाद चार महिन्यानंतर उमटल्याची शक्यता आहे. मनोज तिवारी यांच्यासह पक्षाच्या कार्यकर्त्यांना कालच पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

दिल्लीत कोविडवर नियंत्रण मिळवण्यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सरकार अपयशी ठरल्याचा दावा करत त्यांनी राजघाटावर आंदोलन केलं होतं. यावेळी लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

देशातली कोरोनाबाधितांची संख्या 2 लाखांजवळ, गेल्या 24 तासांत तब्बल इतक्या जणांना कोरोना!

आनंदाची बातमी… 6 वर्षीय चिमुरडीची आणि 66 वर्षीय वृद्धाची कोरोनावर यशस्वीरित्या मात!

महत्वाच्या बातम्या-

राज्यात कोरोनामुक्त पोलिसांच्या संख्येत वाढ; दिवसभरात 35 पोलिसांना डिस्चार्ज

एटीकेटी, बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांचं काय?; उदय सामंत म्हणाले…

‘…तर तोंड बंद ठेवा’; पोलीस अधिकाऱ्याचा डोनाल्ड ट्रम्प यांना सल्ला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या