सरकार आमचे आहे असं वाटत नाही- खासदार आढळराव पाटील

खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील

पुणे | सरकार आमचे नक्कीच नाही, असं धक्कादायक वक्तव्य शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केलंय. ते पुणे जिल्ह्यातील मंचरमध्ये पत्रकारांच्या कार्यशाळेत बोलत होते.

भाजप तालुकाध्यक्ष जयसिंगराव एरंडे बोलण्यासाठी उठले असताना “बोला सरकार तुमचे आहे”, असं म्हणून राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी त्यांना चिमटा काढला. त्यानंतर बोलण्यासाठी उठलेले खासदार आढळराव पाटील दोघांकडे पाहून म्हणाले, “सरकार कोणाचे आहे माहीत नाही, मात्र आमचे नक्कीच नाही.”