मस्ती माझी नाही तुमची जिरलीय; अजित पवारांच्या टीकेला आढळरावांचं प्रत्युत्तर

मस्ती माझी नाही तुमची जिरलीय; अजित पवारांच्या टीकेला आढळरावांचं प्रत्युत्तर

पुणे | मस्ती माझी नाही तर तुमची जिरलीय, असं म्हणत शिवसेेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांना जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे.

मुलाचा पराभव झाल्याने तोंड कुणाचं काळवंडलंय हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलंय, अशा शब्दात आढळरावांनी अजित पवारांवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

माझ्या पक्षाचे 18 खासदार आहेत आणि तुमच्या पक्षाचे 4 खासदार आहेत. जरा आत्मचिंतन करा. ज्याला आपल्या मुलाला निवडून आणता आलं नाही त्याने माझ्यावर टीका करणं बरोबर नाही, असं आढळराव म्हणाले आहेत.

दरम्यान, अजित पवारांनी माझ्या पराभवाची काळजी करण्यापेक्षा स्वत:च्या मुलाच्या पराभवाच्या वेदनेतून बाहेर येऊन वास्तव स्विकारावे, असंही आढळराव म्हमाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-धक्कादायक! व्यायामासाठी रस्त्यावर आलेल्या तीन मुलांना वाहनानं चिरडलं

-…म्हणून मी आणि प्रीतम मुंडे संसदेत हसलो- रक्षा खडसे

-नारायण राणे कोणत्या मतदारसंघातून विधानसभा लढवणार?; नितेश राणे म्हणतात…

-पुण्याजवळील लोणी काळभोरजवळ भीषण अपघात; 9 विद्यार्थ्यांचा मृत्यू

-“राष्ट्रवादी जळगावमध्ये इतक्या जागा लढवणार”

Google+ Linkedin