Top News मनोरंजन

“हाय प्रोफाईल पार्ट्यांमध्ये कलाकार सर्रास ड्रग्जचं सेवन करतात”

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात सीबीआय आणि एनसीबी सध्या तपास करत आहेत. याबाबत अभिनेत्री कंगणा राणावतने ड्रग्जचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर आता ब़ॉलिवूडच्या अजून एका अभिनेत्याने याबाबत मोठा खुलासा केला आहे.

अभिनेता अध्ययन सुमनने हायप्रोफाईल पार्ट्यांबदद्ल भाष्य केलं आहे. काही हायप्रोफाईल पार्ट्यांमध्ये अनेक कलाकार ड्रग्जचं सेवन करत असल्याचा धक्कादायक खुलासा अध्ययनने केला आहे. एका मुलाखतीदरम्यान ही गोष्ट अध्ययनने सांगितली आहे.

अध्ययन सुमन याच्या सांगण्यानुसार, “कलाविश्वामध्ये ड्रग्जचं सेवन केलं जातं ही बाब खरी आहे. अनेक हायप्रोफाईल पार्ट्यांमध्ये मी कलाकारांना ड्रग्जचं सेवन करताना पाहिलं आहे. या पार्ट्यांचा एकेकाळी मी देखील भाग होतो. मात्र गेल्या काही वर्षांपासून मी अशा पार्ट्यांना जाणं टाळतो. ड्रग्जचं सेवन फक्त बॉलिवूडमध्येच होतं असं नाही.”

नुकतंच अध्ययनने सुशांतच्या आत्महत्येवर भाष्य केलं होतं. “सुशांत माझा मित्र नव्हता शिवाय मी त्याला ओळखतंही नव्हतो. मात्र तरीही सुशांतचा विचार माझ्या मनात आला की अस्वस्थ होतो.” असं अध्ययनने सांगितलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

भाजप शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांना कोरोनाची लागण

….तर रिया चक्रवर्ती अटकेसाठी तयार, रियाच्या वकिलांची माहिती

जपानमध्ये घरपोच जेवणाची ऑर्डर पोहोचवतोय बॉडी बिल्डर; जाणून घ्या यामागील कारण…

मोदींच्या ‘मन की बात’मधून प्रेरणा घेऊन युवकाने मातीची खेळणी बनवण्याचं ठरवलं!

कोरोना संकटातही अमेरिकेतील बेरोजगारीचा दर आठ टक्क्यांनी घसरला…!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या