अदिती तटकरे होणार ‘या’ जिल्ह्याच्या नव्या पालकमंत्री

Aditi Tatkare l लोकसभा निवडणुकीनंतर सर्वांचे लक्ष विधानसभा निवडणुकीकडे लागले आहे. अशातच राज्याच्या राजकारणातून एक महत्वाची समोर आली आहे. गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून लवकरच आदिती तटकरे यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

अदिती तटकरे पालकमंत्री होणार :

अदिती तटकरे या गोंदिया जिल्ह्याच्या नवीन पालकमंत्री होणार असल्याची माहिती मिळाली आहे. कारण धर्माराव बाबा आत्राम यांनी गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री पद सोडण्याचा मोठा निर्णय घेतल्यानंतर अदिती तटकरे यांचा नावावर शिक्कामोर्तब झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम हे राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री आहेत. मात्र त्यांनी हा मोठा निर्णय घेत गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, गोंदियाचे पालकमंत्रीपद सोडण्याबाबतच्या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिली असल्याचंही त्यांनी बोलताना सांगितलं आहे.

Aditi Tatkare l धर्मराव बाबा आत्राम यांनी प्रकृतीचे दिले कारण :

धर्मराव बाबा आत्राम यांनी प्रकृतीच्या कारणामुळे आणि चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत करायचं असल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचं म्हटलेलं आहे. कारण धर्मराव बाबा आत्राम यांची नुकतीच एक शस्त्रक्रिया झाली आहे असं देखील त्यांनी सांगितलं आहे. तसेच त्यांना गोंदियापर्यंतचा प्रवास रस्ते मार्गाने करणं वारंवार शक्य होत नसल्याचं आत्राम म्हणाले आहेत.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपचा दारुण पराभव झाला आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे प्रशांत पाडोळे दणदणीत विजयी झाले आहेत. या जागेवर जरी भाजपचा उमेदवार असला तरी भंडारा-गोंदियाची जबाबदारी प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसवर होती. मात्र तिथे महायुतीला अपयश मिळालं आहे. त्यामुळे आत्राम यांनी अचानक गोंदियाचा पालकमंत्री पद सोडण्यामागे राजकीय कारणंही आहेत का? अशी शंका निर्माण होत असल्याचं आहे.

News Title – Aditi Tatkare Guardian Minister

महत्त्वाच्या बातम्या

वट सावित्री पौर्णिमा का साजरी करतात? जाणून घ्या यामागचे कारण

सहा वर्षीय बालिकेला अत्याचार करुन संपवलं, संतप्त जमावानी केलं धक्कादायक कृत्य

मोठी बातमी! अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर

या दोन राशीच्या व्यक्तींना सौभाग्य लाभणार

सलमान खान गोळीबार प्रकरणी मोठी माहिती समोर!