बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आदित्य दादा, राजगडावर रोपवे बांधू नका’; चिमुकल्या गडप्रेमीचं पर्यटनमंत्र्यांना पत्र

पुणे | पुणे जिल्ह्यातील एकविरा देवी मंदिर आणि राजगड किल्ल्यावर पर्यटकांना लवकरच रोपवे ची सुविधा उपलब्ध होणार आहे. कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातल्या एका चिमुकलीनं राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. या चिमुकलीच्या पत्रानं सर्वांचंच लक्ष वेधुन घेतलं आहे.

पुणे जिल्ह्यातल्या एकाविरा देवी मंदिर आणि राजगड किल्ल्यावर पर्यटकांसाठी रोप- वेची सुविधा उपलब्ध होणार आहे. सह्याद्री अतिथीगृहावर आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत या करारावर सह्या करण्यात आल्या. पर्यटन विभागाकडून हा रोपवे बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र हा रोपवे बांधू नये अशी मागणी एका चिमुकलीनं पत्राद्वारे केली आहे.

ही छोटी मुलगी गडप्रेमी आणि ट्रेकर असून साईषा अभिजीत धुमाळ असं तिचं नाव आहे. तिनं पत्रात लिहिलं की, माननीय आदित्य दादा यांना पत्रास कारण की, राजगडावर रोपवे बांधू नका. कारण गडावर आणि आजूबाजूला फुलपाखरु, हरण, मोर, ससे यांची घरं असतात. आपण गर्दी केली तर हे सगळे तिथून निघून जातील. त्यांना त्यांच्या घरामधून बाहेर काढू नका प्लीज. मला ट्रेकिंगला गेल्यावर त्यांना लपून पाहायला, फुलपाखरांच्या मागे धावायला आवडतं. आपण त्यांना आपल्या घरी राहू देत नाही. मग त्यांना त्यांच्या घरामधून बाहेर पाठवतो. मी एक छोटी गडप्रेमी आणि ट्रेकर साईषा अभिजीत धुमाळ.

दरम्यान, पुण्यातील दुर्गवेड्या चिमुरडीनं हे पत्र महाराष्ट्र मुख्यमंत्री कार्यालयाच्या पत्त्यावर धाडलं आहे. त्यामुळे पर्यावर मंत्री आदित्या ठाकरे या चिमुकलीची आर्त हाक ऐकून रोपवे तयार करण्याचा निर्णय मागे घेणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

भन्नाट ऑफर! लस घेतल्यास पब आणि बारमध्ये मिळणार 50% सूट

जम्मू काश्मीरला पुन्हा स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळणार?; मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याचा तयारीत

कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटचा ‘या’ वयोगटातील लोकांना अधिक धोका!

“ठाकरे सरकारलाच कोरोनाची लागण, सरकार गेल्याशिवाय हा कोरोना बरा होणार नाही”

‘राष्ट्रवादी-शिवसेनेत वितुष्ट निर्माण होणार नाही’; सरनाईकांच्या लेटरबॉम्बनंतरही राष्ट्रवादीला विश्वास

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More