महाराष्ट्र मुंबई

आई-बापाची भांडणं; आता पोरानं आईविरोधात ठोकला शड्डू!

मुंबई | कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव राजकारणात सक्रिय होत असून त्यांच्या पॅनलची घोषणा करण्यात आली आहे. अकरावीत शिकत असलेला हर्षवर्धन जाधव यांचा मुलगा आदित्य जाधव यांनं थेट पत्रकार परिषद घेऊन वडिलांच्या पॅनलची अधिकृत घोषणा केली आहे.

आदित्य जाधव याने आई संजना जाधव यांच्या विरोधात हर्षवर्धन यांचं पॅनल उभं केलं आहे. हर्षवर्धन जाधव यांना अटक झाल्यानंतर आदित्यने स्वतः सर्व सूत्रे हातात घेतली आहेत.

अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान, बंद पडलेली मका खरेदी यासारख्या अनेक समस्यांना सामना सध्या शेतकऱ्यांना करावा लागत आहे. हर्षवर्धन जाधव हे शेतकऱ्यांसाठी राजकारणात सक्रिय होत असून तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती निवडणुका लढवणार असल्याची घोषणा आदित्य जाधवने केली आहे.

तालुक्यातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून सर्व कार्यकर्ते सोबत असल्याचं आदित्यने म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज; वेतनात वाढ, सेवानिवृत्तीचं वयही वाढवलं!

‘आपला तो ‘बाब्या’ दुसऱ्याचा तो….’; निलेश राणेंची शिवसेनेवर टीका

‘मी ड्रग्जच्या आहारी गेले होते’; डीअर एनसीबी, कंगणाला चौकशीसाठी कधी बोलवणार?

‘शिवसेना-राष्ट्रवादी मिळून आपल्याविरुद्ध रणनीती आखताहेत’; काँग्रेस नेत्याचं सोनिया गांधींना पत्र

पुण्यात आता हेच बघायचं बाकी राहिलं होतं; रानगव्यांनंतर दिसला हरणांचा कळप!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या