“कंगना आणि मी पती-पत्नी सारखं..”; प्रसिद्ध अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

Kangana Ranaut | बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत आता खासदार बनली आहे. भाजपकडून हिमाचल प्रदेशमधील मंडी येथून कंगनाने लोकसभा निवडणूक लढवली. यात कंगनाने कॉँग्रेसचे विक्रमादित्य सिंह यांचा पराभव केला. त्यामुळे कंगना आता राजकारणात देखील सक्रिय झाली आहे.

अशात कंगनाबद्दल एक मोठा खुलासा झाला आहे. कायम वादग्रस्त कारणांमुळे चर्चेत असणाऱ्या कंगनाबद्दल प्रसिद्ध अभिनेत्याने धक्कादायक खुलासा केला आहे. बॉलीवुडमध्ये आल्यानंतर कंगनाचं नाव अनेकांसोबत जोडलं गेलं होतं.

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याचं धक्कादायक वक्तव्य

मात्र, कंगनाचं नातं कधीच लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. पण एक अभिनेता म्हणाला होता की, ‘मी आणि कंगना पती-पत्नी सारखं राहातो…’, आता हा अभिनेता कोण आणि तो असं का म्हणाला याबाबत प्रश्न पडणं साहजिकच आहे.

कंगनाबद्दल (Kangana Ranaut ) असं विधान करणारा अभिनेता दूसरा-तिसरा कुणी नसून अभिनेता आदित्य पांचोली आहे. आदित्य आणि कंगना यांनी एकमेकांना अनेक वर्ष डेट केलं आहे. दोघांमध्ये तब्बल 21 वर्षाचं अंतर होतं. तेव्हा कंगनाने नुकतीच आपल्या करीअरची सुरुवात केली होती.

‘या’ अभिनेत्यासोबत होतं कंगनाचं अफेअर

मात्र, ब्रेकअपनंतर आदित्य पांचोली याने अभिनेत्रीवर अनेक गंभीर आरोप केले होते. “कंगना हिच्यासोबत जेव्हा ओळख झाली तेव्हा तिच्याकडे एक रुपया देखील नव्हता. 2004 मध्ये माझी आणि कंगनाची ओळख झाली होती. एका मित्राने मला तिची मदत करण्यासाठी सांगितलं होतं. जवळपास तीन वर्ष आम्ही एका घरात पती-पत्नी सारखं राहात होतो.”, असं आदित्य म्हणाला होता.

इतकंच नाही तर, “कंगनाला एक मुलगा सतत त्रास देत होता. पण त्याच मुलासोबत ती खूप वेळ फोनवर बोलायची.”, असं देखील आदित्य म्हणाला होता.दुसरीकडे कंगनाने (Kangana Ranaut ) देखील आदित्यवर मारहाण केल्याचा आरोप केला होता. हे प्रकरण तसं जुनं असलं तरी सध्या याची चर्चा होते आहे.

News Title : Aditya Pancholi shocking revelation about Kangana Ranaut

महत्त्वाच्या बातम्या-

शेतकऱ्यांनो पेरणी करण्यापुर्वी ही बातमी वाचाच!, नाहीतर बसेल मोठा फटका

‘सरकार पक्ष फोडण्यात व्यस्त आहे’, सुप्रिया सुळेंनी वाचून दाखवला समस्यांचा पाढा

सर्वसामान्यांना दणका! कांदा पुन्हा रडवणार, दरात ‘इतक्या’ रुपयांची वाढ

मान्सूनचं राज्यात जोरदार स्वागत, ‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी

मोठी बातमी! प्रसिद्ध अभिनेत्याला खुनाच्या आरोपाखाली अटक