सोलापूर | जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी तिवरे धरण फुटीचं खापर खेकड्यांवर फोडलं होतं. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील मंत्री सावंतांच्या सुरात सूर मिसळला.
आदित्य यांनी खेकडे धरणं फुटण्याला कसे कारणीभूत ठरतात याचं उदाहरण दिलं. सोलापूरातल्या एका कार्यक्रमात एका विद्यार्थ्याच्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
तानाजी सावंत यांनी तिवरे धरण खेकड्यामुंळे फुटल्याची अजब थेअरी महाराष्ट्राला सांगितली होती. त्यावरून संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. विरोधी पक्षांनी सावंत यांच्याविरोधात जोरदार आंदोलनेही केली होती.
दरम्यान,आदित्य ठाकरेंच्या आजच्या वक्तव्याने पुन्हा एकदा महाराष्ट्रभर खेकड्यांमुळे धरण फुटू शकते का?? यावर चर्चा झडण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या-
-राष्ट्रवादीने अमोल कोल्हे आणि उदयनराजेंच्या खांद्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी
-सोलापुरात बँक ऑफ महाराष्ट्रचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना!
-राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी का दिली??? चित्रा वाघ म्हणतात…
-तिहेरी तलाक विधेयकावर असदुद्दीन ओवैसींची संतप्त प्रतिक्रिया; म्हणतात…
-राज्यातील महिला देणार मुख्यमंत्र्यांना 21 लाख राख्या!
Comments are closed.