बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे, तुम्हाला….’; अफगाणी विद्यार्थ्यांना आदित्य ठाकरेंनी दिला धीर

मुंबई | तालिबानने रविवारी अफगाणिस्तानची राजधानी काबूल शांततामय मार्गाने जिंकत अखेर संपुर्ण देशावर कब्जा केला. त्यानंतर अफगाणिस्तानमधील नागरिक कचाट्यात सापडल्याचं दिसत आहे. त्यामुळे अफगाणी नागरिकांची आणि अनेक विदेशी नागरिकांची देश सोडण्याची धडपड चालू झाली होती. त्यात आता अफगाणी विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे.

आपला आख्खा देश संपल्यानं अफगाणी विद्यार्थी संकंटात सापडल्याचं दिसत आहे. आपल्या परिवाराची कोणतीही माहिती मिळत नाही. त्यामुळे अफगाणी विद्यार्थी चिंतेत आहेत. पुण्याला विद्येचं माहेरघर म्हटलं जातं. पुण्यास सुमारे 3 हजारहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर महाराष्ट्रात ही संख्या साधारण 5 हजाराच्या घरात आहे. त्यामुळे आता या विद्यार्थ्यांना धीर देण्यासाठी आदित्य ठाकरे समोर आले आहेत.

आदित्य ठाकरे हे राज्याचे राजशिष्टाचार मंत्री आहे. त्यांनी पुणे विद्यापीठात शिकणाऱ्या अफगाणी विद्यार्थ्यांची भेट घेतली. महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे. या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात काही त्रास होणार नाही, याची खात्री घेतली जाईल, असं आश्वासन आदित्य ठाकरे यांनी या विद्या़र्थ्यांना दिलं आहे.

दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाशी बोलून या विद्यार्थ्यांना त्यांच्या कुटूंबीयांशी संपर्क करून दिला जाईल. ज्या अफगाणी विद्यार्थ्यांची फी राहिली आहे. त्यांना फीमध्ये देखील सवलती दिल्या जातील, असंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे. परिवाराशी संपर्क होत नसल्यानं आता या विद्यार्थ्य़ांना आता आर्थिक संकटाला देखील सामोरं जावा लागत असल्याचं दिसत आहे.

थोडक्यात बातम्या-

“लवकरच मोदी सरकार कोसळणार, राहुल गांधी होणार पुढील पंतप्रधान”

सारं जग झुकलं मात्र ‘हा’ पठ्ठ्या एकटा तालिबानपुढं उभा ठाकलाय, याचा गड अजूनही अभेद्य कसा?

शरद पवारांचा राज ठाकरेंना सल्ला, आता संभाजी ब्रिगेड ‘ही’ भेट पाठवणार!

एकनाथ खडसेंना मोठा धक्का, उद्याच पत्नीची चौकशी होणार!

भाजपने अमर, अकबर, अँथनी हा चित्रपट पाहिला नसेल तर पाहावा- नाना पटोले 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More