मुंबई | दोन दिवसांपासून राजधानी मुंबईला पावसाने झोडपून काढलंय. जनजीवन विस्कळीत झालंय. मात्र ही नैसर्गिक स्थिती आहे, उगीचच पालिकेला दोष देऊन नका, असं वक्तव्य युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.
मुंबईत कुठेच पाणी तुंबलं नाही, असा दावा मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला होता. त्यानंतर आता आदित्य यांनी पालिकेला दोषी ठरवू नका, असं म्हटलंय.
मुंबईच्या वांद्र्यातल्या कलानगर भागात पाणी साचल्याने आदित्य यांना ‘मातोश्री’बाहेर पडणे शक्य होत नाही, असं वृत्त ‘एबीपी माझा’ने दिलं आहे.
दरम्यान, महापौरांच्या आणि आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मालाड दुर्घटना पालिकेचं अपयश नाही तर तो एक अपघात- संजय राऊत
-गरज असेल तरच घराबाहेर पडा; प्रशासनाचं पुणेकरांना आवाहन
-मुंबईत पावसाने करुन दाखवलंय; ‘मातोश्री’जवळ तुंबलं पाणी
-नारायण राणे नाही लढले तर देवदत्त सामंतच निवडणूक लढणार
-…आणि राष्ट्रवादीच्या मुख्य प्रवक्त्यांना रात्र जागून काढावी लागली
Comments are closed.