“…तेव्हापासून भाजपला महाविकास आघाडीची भिती वाटायला लागली”
मुंबई | पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे राहुल कनाल आणि संजय कदम यांच्याविरोधात आयकर विभागाने कारवाईचा बडगा उचलला आहे. राहुल कनाल आणि संजय कदम यांच्या मुंबईतील घरांवर आयकर विभागाने छापे टाकले. यानंतर आरोप-प्रत्यारोपाच्या राजकारणाला सुरूवात झाली आहे.
आयकर विभागाच्या या कारवाईचं भाजपकडून समर्थन करण्यात येत आहे. तर कारवाईनंतर महाविकास आघाडीतून नाराजीचा सुर उमटत आहे. राहुल कनाल आणि संजय कदम आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जातात. यांच्यावरील कारवाईनंतर आदित्य ठाकरेंनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्रावर आधीही अशी आक्रमणं झाली आहेत. हे दिल्लीचं आक्रमणच आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये जेव्हा इथे निवडणुका लागतील असं समजलं तेव्हापासून भाजपला महाविकास आघाडीची भिती वाटायला लागली, तेव्हापासून हे सुरू आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
दरम्यान, सगळ्या तपास यंत्रणा भाजपच्या प्रचार यंत्रणाच झालेल्या आहेत. पण महाराष्ट्र झुकणार नाही आणि महाराष्ट्र थांबणार नाही. ही तर भाजपची प्रचार यंत्रणाच आहे. लोकशाही राहिली कुठे?, असा घणाघात देखील आदित्य ठाकरेंनी केला आहे.
थोडक्यात बातम्या-
Women’s Day निमित्तानं मुंबई पोलीस महिलांना मिळालं ‘हे’ खास गिफ्ट
“त्यांचं वाटोळं होईल, त्यांना दिव्यांग मुलं जन्माला येतील”
संजय राऊतांचं थेट पंतप्रधान मोदींना 13 पानी पत्र, म्हणाले…
पेट्रोल-डिझेल महाग म्हणून सीएनजी गाड्या घेतल्या, अशा लोकांना झटका देणारी बातमी
उत्तराखंडात आप ठरणार किंग मेकर, वाचा एक्झिट पोलचा अंदाज
Comments are closed.