एकीकडे पूरग्रस्तांचे हाल तर दुसरीकडे फोडाफोडीचं राजकारण सुरूये- आदित्य ठाकरे
मुंबई | महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत सध्या पावसाचे सावट आहे. गेल्या आठवड्याभरात झालेल्या पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक नद्या-नाल्यांना पूर आला आहे. तसेच शहरांना पाणीपूरवठा करणारे तलाव देखील 100% ची पातळी ओलांडून ओसंडून वाहत आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्रात फोडाफोडीचं राजकारण सुरूये.
यावर आता माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) टीका केली आहे. एकीकडे महाराष्ट्रात पूरपरिस्थिती आहे, पूरग्रस्त नागरीकांचे हाल होताना दिसत आहेत, तर दुसरीकडे महाराष्ट्राचे सत्ताधारी राजकरणी मात्र, फोडाफोडी आणि राजकारणांत गुंतले आहेत, असं आदित्य ठाकरे म्हणाले. प्रशासनावर कोणाचा अंकुश नाही, कोणीही काहीही करत आहे, कोणत्याही विभागात मंत्री नाही, अद्याप खातेवाटप नाही, असा आरोप देखील त्यांनी केला.
पूरस्थितीत शिवसेना नागरीकांच्या मदतीला धावत आहे, असा दावा आदित्य यांनी केला. युवासेनेचे कार्यकर्त्ये पूरग्रस्तांना मदत करत आहे. राजकारण्यांना बळी न पडता पूरस्थिती असलेल्या ठिकाणी मदत करा, असं आव्हान त्यांनी युवासेनेच्या कार्यकर्त्यांना केलं आहे.
शिंदे गटाचे आमदार ठाकरे कुटूंबीयांचा राग राग करत आहेत. जरी ते आमच्यावर राग राग करत असले तरी आमच्या मनात त्यांच्याबद्दल कोणताही राग नाही. त्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला. अशाप्रकारे जर कोणी एखादा पक्ष फोडून गट तयार करत असेल तर तो लोकशाहीचा अपमान आहे. शिंदे गटात जाण्यासाठी ईच्छूक खासदारांनी खुशाल जावं, आम्ही त्यांना अडवणार नाही, असं यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले.
थोडक्यात बातम्या –
राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून अलर्ट जारी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची मोठी घोषणा; महाराष्ट्रातील ‘हा’ रस्ता होणार राष्ट्रीय महामार्ग
अमित शहांचे सहकारी सल्ला घेण्यासाठी शरद पवारांच्या भेटीला; खुद्द पवारांनी दिली माहिती
उद्धव ठाकरेंना एकाच दिवशी सलग पाच धक्के!
सुष्मिताबाबत एक्स बाँयफ्रेंड विक्रम भट्ट यांचा मोठा खुलासा, म्हणाले…
Comments are closed.