मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. राजकीय वर्तुळात तशी जोरदार चर्चा रंगली असून लवकरच त्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
आगामी मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या जयदत्त क्षीरसागर यांना आरोग्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. सोबतच शिवसेनेला आणखी दोन राज्यमंत्रिपदे मिळणार असल्याची माहिती आहे.
आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्री करण्यास भाजपने होकार दिल्याचं कळतंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे.
दरम्यान, केंद्रात शिवसेनेला एकच तेही अवजड उद्योगमंत्रिपद मिळालं आहे, मात्र आदित्य यांना उपमुख्यमंत्री करण्यास भाजपनं होकार दिल्यानं उद्धव ठाकरेंनी आपली नाराजी व्यक्त केली नाही, अशी चर्चा आहे.
महत्वाच्या बातम्या
-तुम्ही चिंता करु नका, शांत राहा; आमचं सगळं ठरलंय!
-धोनी झुकणार की आयसीसीचा निर्णय झुगारणार?
-११ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन मृतदेह स्मशानभूमीत फेकला
-धक्कादायक! गेल्या ६ वर्षात ग्रामीण युवकांच्या बेरोजगारीत ३ पटींनी वाढ
-भारतीय हवाई दलाच्या बेपत्ता विमानाची माहिती देणाऱ्यास बक्षिसाची घोषणा
Comments are closed.